लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (वय ३०, रा. म्हाडा कॉलनी, पैठण) व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (वय ३६, रा. आपेगाव, ता. पैठण) या दोन लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (४ ऑगस्ट) दुपारी चारला पैठण तहसील कार्यालयात ८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. शेतजमिनीचे वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी त्‍यांनी स्वीकारली.

बिनीवाले आणि कोल्हे या लाचखोरांची तक्रार एका शेतकऱ्याने एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली होती. शेतकऱ्याची पैठण तालुक्यातील आगर नांदरच्या गट क्र. ५८ मध्ये ५० आर सामायिक शेतजमीन असून, त्‍यातील १६ आर जमीन शेतकऱ्याच्या नावावर येते. २५ जुलै रोजी त्यांनी जमिनीच्या वाटणीपत्रासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. वाटणीपत्र करून देण्यासाठी कोल्हे याने बिनीवालेच्या नावाने १० हजार रुपयांची मागणी केली.

पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, धर्मराज बांगर यांनी लाचेच्या मागणीची खातरजमा केली. कोल्हेने तडजोडीअंती ८ हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवली. कोल्हेने बिनीवालेला कॉल करून याबाबत विचारणाही केली. कोल्हेने पैसे घेताच ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने खांद्यावरचा गमछा खाली उतरवला अन्‌ एसीबीच्या पथकाने कोल्हेवर झडप घातली. ही कारवाई गुसिंगे, बांगर यांच्यासह अंमलदार राजेंद्र नंदिले, युवराज हिवाळे, सी. एन. बागूल यांनी केली. बिनीवालेलासुद्धा लगेचच ताब्‍यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software