- Marathi News
- सिटी क्राईम
- हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्...
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्यामुळे प्रशासनाने रात्रीची तपासणी सुरू केली. काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्यामुळे १० नंतर नो एंट्री केली! राष्ट्रीय विधी विद्यापीठ शिस्तीसाठी सक्त झाले. पण ही ‘शिस्त’ न रूचल्याने ६३ मागण्यांची यादी घेऊन विद्यार्थ्यांनी सोमवारी (४ ऑगस्ट) सकाळपासून विद्यापीठ प्रशासनावर दबाव वाढवला आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
रात्री-अपरात्री वसतिगृहातील खोल्यांची तपासणी, मेसच्या जेवणाचा निकृष्ठ दर्जा, रात्री १० वाजेनंतर वसतिगृहात नो एंट्री, उशीर झाला की पालकांकडे तक्रार, ग्रंथालय खुले नसते, वैद्यकीय सुविधा नाहीत, काही प्राध्यापकांचे वर्तन योग्य नाही, विद्यार्थ्यांना ड्रेस कोड, वसतिगृहाच्या वॉर्डनचा राजीनामा घ्यावा, काही विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट अशा एकूण ६३ तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
विद्यापीठ सक्त का झाले?
विद्यापीठ प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, वसतिगृहातील काही खोल्यांत आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. त्यामुळे रात्री तपासणी सुरू केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रात्री १० पर्यंतच वसतिगृहात येण्याची वेळ ठेवली आहे. रात्री एक-दोनला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे गैरवर्तन पालकांना कळविले जाते. ग्रंथालयाची सुविधा २४ तास उपलब्ध असून, वैद्यकीय सुविधाही पुरवली आहे. पूर्णवेळ डॉक्टर अन् २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध आहे. शिस्त लावण्यासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील काही दिवस ड्रेस बंधनकारक करण्यात आला आहे. जेवणाचा दर्जा उत्तम तर पिण्याचे शुद्ध पाणी पुरवले जाते. कुलगुरू डॉ. डॉ. बिंदू रोनाल्ड यांनी सांगितले, की विद्यापीठात प्रवेश घेतानाच सर्व नियमांची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन बंधनकारक आहे. त्यांनीच नियमांचे उल्लंघन केले आणि त्यासाठी हट्ट केला तर कसे होणार?
(विद्यापीठात शिक्षणासाठी येत असताना स्वैराचारी वृत्तीला आळा बसावा, यासाठी काही नियम घालून दिले जात असतील तर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांना समजावण्यापेक्षा त्यांच्या पालकांनीच आपल्या लाडक्या पाल्यांचे कान टोचण्याची गरज निर्माण झाली आहे -संपादक)