इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून घराजवळून १५ वर्षीय मुलीचे प्रियकराने कारमधून अपहरण केले. तिला खुलताबाद, अहिल्यानगरला नेले. तिथे एका हॉटेलमध्ये मुलीने आरडाओरड केल्याने तिला सोडायला तो परत साथीदारांसह छत्रपती संभाजीनगरला आला. त्‍याचवेळी नगर नाक्‍यावर त्‍यांची कार मुलीच्या नातेवाइकांनी अडवून सर्वांना ताब्‍यात घेतले. सोमवारी (४ ऑगस्‍ट) दुपारी सव्वा चारला मुलीचे अपहरण झाले होते, रात्री साडेदहाला तिची सुरक्षित सुटका झाली.

आलिया (नाव बदलले आहे) दहावीत शिकते. सोमवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी आत्‍याकडे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त निमंत्रण असल्याने ती आईच्या सांगण्यावरून गिफ्ट घेण्यासाठी दुपारी चारला गल्लीतील रोडलगत असलेल्या होलसेल दुकानाकडे गेली. सुट्टे पैसे नसल्याने तिच्या आईने त्‍यांचा मोबाइल फोन पेद्वारे बिल देण्यासाठी तिच्याकडे दिला होता. मात्र त्‍यानंतर आलिया घरी परतली नाही. बराच वेळ झाला तरी परत न आल्याने चुलत भावाने दुकानाकडे येऊन तिला शोधले. पण ती दिसली नाही. तिला कॉल केला असता सुरुवातीला बेल जात होती.

रात्री आठनंतर तिच्याकडील मोबाइल बंद येऊ लागला. अखेर आलियाच्या आईने पती आणि नातेवाइकांसह सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. आलियाचा शोध युद्धपातळीवर नातेवाइक घेत असताना त्‍यांनी नगर नाक्‍यावरून आलियाला दोन तरुण आणि एका युवतीसह पकडून घरी आणले. आईने आलियाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने सांगितले, की तिची ओळख शहानूर जहूर शेख (वय २०, रा. मोती कारंजा छत्रपती संभाजीनगर) याच्याशी इस्टाग्रामद्वारे झाली होती. शहानूरने तिला फोन करून होलसेल किराणाजवळ बोलाविले. तेथे गेल्यावर शहानूरने तिला तू चल आपल्याला सामान घ्यायचे आहे, असे म्हणत सोबत घेतले. त्यावेळी दुपारचे सव्वा चार वाजले होते.

त्याने पांढऱ्या कारमध्ये (MH 20 HB 7867) तिला बसवले. कारमध्ये एक बुरखाधारी युवती व दोन व्यक्‍ती बसलेले होते. त्यांनी सुरुवातीला तिला खुलताबाद व नंतर अहिल्यानगर येथे नेले. रस्त्यात त्यांनी आलियाकडील मोबाइल फोन बंद करून ठेवला होता. अहिल्यानगर येथील कुरेशी हॉटेलमध्ये आलियाला जेऊ घातले. त्‍यावेळी आलिया मला घरी सोडा असे म्‍हणत जोरजोरात ओरडल्याने त्यांनी तिला कारने परत छत्रपती संभाजीनगरला आणले. रात्री साडेदहाला ही कार अडवून आलियाच्या नातेवाइकांनी तिला आणि तिच्या सोबतच्या लोकांना ताब्‍यात घेतले. शहानूरसोबतच्या युवतीचे नाव सालेहा व व्यक्‍तीचे नाव साहिल असल्याचे समोर आले. शहानूर, सालेहा आणि साहिल यांच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं...

Latest News

इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं... इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून घराजवळून १५ वर्षीय मुलीचे प्रियकराने कारमधून अपहरण केले. तिला खुलताबाद, अहिल्यानगरला नेले. तिथे...
हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software