अचानक आले, जुन्या मीटरची वायरिंग तोडून स्मार्ट मीटर बसवू लागले, वडगाव कोल्हाटीत नागरिक आक्रमक झाले !

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी येथील सावित्रीबाई फुलेनगरात महावितरणच्या ठेकेदार कंपनीची माणसे आज, ४ एप्रिलला दुपारी दोनला अचानक अवतरली. आल्या आल्या त्‍यांनी अनेकांचे जुने मीटर वायर तोडून काढले आणि स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली. कोणतीही विचारपूस न करता सुरू असलेला हा कारभार पाहून नागरिक संतप्त झाले. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवले आणि काढता पाय घेतला.

पूर्वसूचना न देता जुन्या मीटरऐवजी सरसकट स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. क्रिस्टल इलेक्ट्रिकल्स या खासगी कंपनीने वाळूज महानगरात स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका घेतला असून, त्‍यांचे कर्मचारी सावित्रीबाई फुलेनगरात आले होते. घरमालकाची परवानगी न घेता थेट जुन्या मीटरचे वायरिंग तोडून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली होती. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम, नरेंद्र त्रिभुवन, कामगार नेते अशोक निकम यांनी तिथे येऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

हळूहळू नागरिक जमून त्‍यांचा संताप वाढत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी आधी बसवलेले १५ ते १६ स्मार्ट मीटर काढून घेतले आणि तिथून निघून गेले. यापुढे ठेकेदाराने नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी होत आहे. या घटनेबाबत क्रिस्टल इलेक्ट्रिकल्सचे ठेकेदार शेख मुक्तार यांच्याशी संपर्क केला असता ते म्‍हणाले, की मी माझ्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या असून, एखादा ग्राहक स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करत असेल तर त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवू नका. अशी काही चूक झाली असेल तर मी सुधारणा करतो, असे ते म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software