बजाजनगरमध्ये स्फोट होऊन फ्रीजचे अक्षरशः तुकडे; घराला तडे, सुदैवाने वाचल्या कुटुंबातील महिला

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट होऊन मोठा आवाज झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती, की फ्रीजचे तुकडे होऊन भिंती, छत आणि खिडक्‍यांना तडे गेले. संसार साहित्‍याचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज, ४ ऑगस्टला सकाळी बजाजनगरातील आर. एल. ३७/१ येथे राजू वाघमारे यांच्या घरात घडली.

WhatsAppImage2025-08-04at9.43.50PM

स्‍फोट झाला तेव्हा घरात कुटुंबातील दोन महिला होत्‍या. सुदैवाने दोघींनाही कोणती दुखापत झाली नाही. स्फोटाचा आवाज ऐकून नागरिक मदतीला धावून आले. अग्निशामक दलाला कळविण्यात येताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोटाचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्‍याचा तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software