शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर नफ्याचे आमिष, महिलेला ३४ लाखांचा गंडा, फेसबुकवरून फेकले जाळे!, छ. संभाजीनगरातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी छत्रपती संभाजीनगरातील महिलेला ३४ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. जिन्सी पोलिसांनी श्रुती सिंधवाणी व नितीन कामत या दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मरियम नुसरत खान (वय ३५, रा. जिन्सी टॉवर, खासगेटजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍या पती, दोन मुलांसह राहतात. त्‍यांचे पती टाटा कॅपिटल लिमिटेड येथे व्यवस्थापक आहेत. मरियम हा फेसबुक बघत असताना त्‍यांना झेरोधा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीची जाहिरात दिसली. त्‍यावर मरियम यांनी व्हॉटस ॲपद्वारे संपर्क केला व गुंतवणुकीसंदर्भात माहिती विचारली. समोरून व्हॉटस ॲप‌द्वारे श्रुती शिंधवानी हिने मरियम यांना संपर्क केला. हवी असलेली माहिती दिली. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी श्रुतीने मरियम यांना व्हॉट्‌स ॲप ग्रुपची लिंक पाठवली. तुम्हाला जेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, तेव्हा मला संपर्क करा.

मी तुम्हाला एक बँक खाते क्रमांक देते. त्या बँक खात्यावर पैसे टाका, असे श्रुतीने सांगितले. शेअरमार्केट मध्ये पैसे गुंतवायचे असल्याने मरियम यांनी श्रुतीशी संपर्क केला. तिने मरियम यांना तुषार इंटरप्रायजेसचा कोटक महिंद्रा बँकेचा खातेक्रमांक देऊन पैसे टाकण्यास सांगितले. त्यानुसार मरियम यांनी ५ हजार रुपये गुगल पेद्वारे जमा केले. नंतर श्रुतीने वेळोवेळी मरियम यांच्याकडून पैसे घेत एकूण ३४ लाख ८७ हजार ०६७ रुपयांचा गंडा घातला. आर्थिक फसवणूक व मानसिक छळ करणाऱ्या श्रुती सिंधवाणी व नितीन कामत या दोघांविरुद्ध मरियम यांनी पोलीस तक्रार केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software