ट्रकमधून ५० गॅस सिलिंडरची चोरी, नारेगावमधील कबीर चौकातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एमआयडीसीतील नारेगाव येथील कबीर चौकात उभ्या ट्रकमधून चोरट्यांनी ५० गॅस सिलिंडर गायब केले आहेत. दीड लाख रुपयांचे सिलिंडर चोरीला गेल्याची तक्रार ट्रकमालकाने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (३ ऑगस्ट) केली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

नारायण शंकरराव खरात (वय ६३, रा. रामगोपालनगर पडेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांचे वाळूज येथे गॅस सिलिंडर ट्रान्सपोर्टचे ऑफिस असून नारेगाव येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीमधून भरलेले घरगुती गॅस सिलिंडर घेऊन ते विविध जिल्ह्यांतील कंपनीच्या वितरकांकडे विक्रीसाठी नेऊन देण्याचे काम करतात. त्‍या बदल्यात कंपनीकडून त्‍यांना गाडी भाडे दिले जाते. त्‍यांच्या मालकीच्या ७ ट्रक आहेत.

बुधवारी (३० जुलै) रात्री ९ ला त्‍यांची ट्रान्सपोर्टची गाडी (MH 20 DE8959) हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनी नारेगाव येथून चालक जुबेर अहेमद मोहम्मद अब्दुल नसीर (वय ५९) याच्या ताब्‍यात दिलेली होती. त्‍यात ३४२ भरलेले घरगुती गॅस सिलिंडर होते. अकोला जिल्ह्यात हे सिलिंडर नेऊन दिल्यानंतर रिकामे सिलिंडर घेऊन तो पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आला. शुक्रवारी (१ ऑगस्ट) मध्यरात्री त्‍याने ट्रक पार्किंगसाठी जागा न मिळाल्याने नारेगावजवळील कबीर चौकात लावली होती. रात्रीतून चोरट्यांनी ट्रकमधून दीड लाख रुपये किंमतीचे ५० रिकामे सिलिंडर चोरून नेले. ही शनिवारी (२ ऑगस्‍ट) सकाळी समोर आली. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश तांबोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software