कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना

On

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : चार महिन्यांपूर्वीच लग्‍न झालेल्या २७ वर्षीय तरुणाने जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलावरून पाण्यात उडी घेत आत्‍महत्‍या केली. मृतदेह सोमवारी (४ ऑगस्‍ट) आढळला. गंगापूर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन त्‍याला गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. संतोष महाजन बहुरे (वय २७, रा. चांभारवाडी, ता. अंबड, जि. जालना) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

संतोष अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे कृषी खात्यात वरिष्ठ लिपिक होता. तो रविवारी दुपारी १२ ला बुलेटने जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर आला. तिथून त्‍याने गोदापात्रात उडी घेतली. काही मच्छिमारांनी त्याला पाहिले होते. मात्र वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक आणि फुगवटा क्षेत्रातील वाढलेल्या पाणीपातळीमुळे संतोषला वाचवला आले नाही. सोमवारी सकाळी अकराला मृतदेह पाण्यावर तरंगून आला.

पोलिसांनी ओळख पटवून नातेवाइकांना कळवले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. चांभारवाडी येथील महाजन बहुरे हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्‍यांनी पोटाला चिमटा देऊन मनोज आणि संतोष या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले. मनोज नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात आहे. चार महिन्यांपूर्वीच संतोषचे लग्‍न झाले होते. पतीचा मृतदेह पाहून पत्नी प्रियाने टाहो फोडला. संतोषच्या आत्‍महत्‍येमुळे गावात हळहळ व्यक्‍त होत आहे.

पैठणच्या वाहेगावमध्ये ३० वर्षीय युवकाची आत्‍महत्‍या
पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे परमेश्वर रमेश बोबडे (वय ३०) याने राहत्‍या घरात गळफास घेऊन रविवारी (३ ऑगस्ट) मध्यरात्री १२ ला आत्महत्या केली. परमेश्वरने घरातील खोलीत पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेतला. सोमवारी (४ ऑगस्ट) पहाटे दीडला त्याच्या भावाने पाहिले अन्‌ एकच हंबरडा फोडला. पैठण येथील शासकीय रुग्णालयात परमेश्वरला आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परमेश्वरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software