पैसे दिले नाही तर मर्डरच करतो म्हणत धारदार चाकू पोटात खुपसला!; युवक रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळला!! उस्मानपुऱ्यातील गाडे चौक हादरला

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात चाकूहल्ले सर्रास होत असतात. छोट्या छोट्या कारणावरून कुणीही चाकू काढते आणि भोसकून टाकते… बिहारच्या औरंगाबादसारखी छत्रपती संभाजीनगरची अवस्था झाली आहे. कायदा-सुव्यवस्था नावालाच उरली असून, मर्डर-हाफमर्डरच्या घटना वाढल्याने भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. उस्मानपुऱ्यातील गाडे चौकात शनिवारी (२१ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या घटनेने कहर केला आहे. एका […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात चाकूहल्ले सर्रास होत असतात. छोट्या छोट्या कारणावरून कुणीही चाकू काढते आणि भोसकून टाकते… बिहारच्या औरंगाबादसारखी छत्रपती संभाजीनगरची अवस्था झाली आहे. कायदा-सुव्यवस्था नावालाच उरली असून, मर्डर-हाफमर्डरच्या घटना वाढल्याने भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. उस्मानपुऱ्यातील गाडे चौकात शनिवारी (२१ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या घटनेने कहर केला आहे. एका युवकाला पैसे मागून टवाळखोराने मर्डर करतो म्‍हणून चाकूने भोकसले. यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्‍याच्यावर सिग्‍मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आकाश हिवाळे (रा. नागसेननगर) असे हल्लेखोराचे नाव असून, त्‍याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिसांनी रविवारी (२२ जून) दुपारी गुन्हा दाखल केला आहे. नितीन अंबादास पटेकर (वय ३२, रा. फुलेनगर) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. दिलीप अंबादास पटेकर (वय ४२, रा. फुलेनगर ज्योती किराणा दुकानाच्या बाजूला उस्मानपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई, वडील, भाऊ यांच्यासह राहतात. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांचा भाऊ नितीन पटेकर मजुरी करतो. शनिवारी (२१ जून) रात्री १० च्या सुमारास पटेकर हे घरी असताना वस्तीतील मुलांनी येऊन सांगितले, की तुमचा भाऊ नितीनला गाडे चौकात एकाने चाकू मारला आहे. त्‍यामुळे पटेकर हे धावतच गाडे चौक उस्मानपुरा येथे गेले.

तिथे त्‍यांना कळले, की नितीनला त्याचा मित्र प्रेम संजय खरे, सूरज भालेराव यांनी मोटारसायकलीने युनायटेड सिग्मा हॉस्पिटल येथे नेले आहे. पटेकर हे सिग्मा हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे प्रेम खरे यांनी त्‍यांना सांगितले, की नितीन हा त्याचा मित्र समाधान मिसाळ याच्यासोबत स्कुटीवर जात असताना ओळखीचा आकाश हिवाळे (रा. नागसेननगर) याने स्कुटी थांबवून दादागिरी करत नितीनकडे पैशाची मागणी केली. नितीन याने नकार दिला असता त्याने शिवीगाळ करून “तू पैसे नाही दिले तर तुझा मर्डरच करतो,’ अशी धमकी देऊन त्याच्या उजव्या पॅन्टच्या खिशातून धारदार चाकू काढून नितीनच्या पोटात उजव्या बाजूला भोसकून गंभीर जखमी केले. नितीन रक्‍तबंबाळ होऊन कोसळल्‍यानंतर आकाश पळून गेला. परिसरातील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अंधारात नागसेननगरच्या दिशेने पळून गेला. सध्या नितीनवर उपचार सुरू असून, त्‍याची प्रकृती गंभीर आहे.

हल्लेखोराला तातडीने अटक
दरम्‍यान, गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी हल्लेखोर आकाशचा शोध सुरू केला. गोपनीय माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे, सहायक फौजदार अरुण वाघ, प्रवीण मुळे, शिवाजी होडशिळ यांनी आकाशला अटक केली. त्‍याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्‍याच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार?

Latest News

शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार? शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार?
चांगल्या मोबाईल नेटवर्कसाठी, कंपन्या त्यांचे टॉवर विविध ठिकाणी बसवतात. पूर्वी हे मोबाईल टॉवर निवासी क्षेत्रांपासून दूर बसवले जात होते, परंतु...
सूट असो किंवा जीन्स... आता कपडे नाही तर कपाळ पाहून लावा टिकली
एआय क्षेत्रात नाव कमावणाऱ्या जगातील टॉप १०० नेत्यांची यादी जाहीर, भारतीय सीईओ रवी कुमार एस. यांचेही नाव
पित्‍यानेच ८ महिन्यांच्या बाळाला घेतले चावे!, नारेगावची धक्कादायक घटना
हर्सूल सावंगीतील पूनम हॉटेलमध्ये जुगार अड्डा, पोलिसांनी छापा मारून पकडले २४ ‘प्रतिष्ठित’ जुगारी, त्यांची नावे जाणून घ्या...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software