- Marathi News
- सिटी क्राईम
- पुंडलिकनगरातील घटनेचा फॉलोअप : क्रूर तरुणीची तब्येत बिघडली, तिचा ‘एकटीनेच सर्व केल्याचा’ दावा पोलिस...
पुंडलिकनगरातील घटनेचा फॉलोअप : क्रूर तरुणीची तब्येत बिघडली, तिचा ‘एकटीनेच सर्व केल्याचा’ दावा पोलिसांना पटेना, कसून तपास सुरू...
On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने एका तरुणासोबत रासलीला मनवल्या. त्यातून ती गर्भवती झाली. बाळाला जन्म दिल्यानंतर तिने स्वतःच नाळ कापून बाळ गोणीत बांधून कचऱ्यात फेकले होते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळ वाचले. पोलिसांनी तरुणीला अटक केली. पण शुक्रवारी (२९ ऑगस्ट) तिची प्रकृती बिघडली. तिला घाटी रुग्णालयात दाखल केले असून, प्रकृती सुधारल्यानंतर तिची सखोल चौकशी केली जाईल, असे पुंडलिकनगर पोलिसांनी स्पष्ट केले.
कडा कार्यालयात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले भाग्येश पुसदेकर (वय २८, मूळ रा. अंजनगाव सुर्जी, अमरावती, ह. मु., पुंडलिकनगर) गुरुवारी पहाटे साडेचारला गावावरून छत्रपती संभाजीनगरला आले. सिडकोतील वसंतराव नाईक चौकातून पायीच घराकडे निघाले होते. साडेपाच वाजता ते पुंडलिकनगरमधील मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आले असता तिथे दुभाजकावरील कचऱ्यात असलेल्या गोणीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांचे लक्ष वेधले गेले. ती गोणी कुत्रे ओढत होते. भाग्येश यांनी लगेचच आरडाओरड करून नागरिकांना जमवले. सर्वांनी मिळून कुत्र्यांना हाकलले. नंतर गोणीची गाठ सोडली असता त्यात चक्क रक्तबंबाळ नवजात बाळ दिसले. ते पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. जवळच राहणाऱ्या एका आजीने तत्काळ चादर आणून त्या बाळाला गुंडाळले. बाळाला घाटी रुग्णालयात आणण्यात आले. सध्या बाळाची प्रकृती चांगली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, अर्जुन राऊत यांनी आसपासच्या परिसरात, ४० हून अधिक घरांत शोध घेतल्यावर भाड्याने राहणाऱ्या क्रूर तरुणीला अटक केली. ही तरुणी मूळची वाशिमची असून, बारावीपर्यंत शिकलेली आहे. दीड वर्षापूर्वी पतीने तिला सोडले. त्यानंतर ती खासगी कंपनीत काम करून पुंडलिकनगरमध्ये एकटीच राहत होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सूट असो किंवा जीन्स... आता कपडे नाही तर कपाळ पाहून लावा टिकली
By City News Desk
पित्यानेच ८ महिन्यांच्या बाळाला घेतले चावे!, नारेगावची धक्कादायक घटना
By City News Desk
चिकलठाण्यात खून!; खाणावळीतच मित्राचे मित्रावर चाकूने सपासप वार
By City News Desk
Latest News
30 Aug 2025 22:31:54
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...