- Marathi News
- पॉलिटिक्स
- मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा गेल्या शनिवारी (२३ ऑगस्ट) प्रसिद्ध केला. चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग तयार केला आहे. यात सत्ताधाऱ्यांची सोय झाली, तर विरोधकांना काही प्रभाग अडचणीचे ठरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आक्षेपांचाही पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या ४ दिवसांत १४ आक्षेप दाखल झाले आहेत. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ४ सप्टेंबरची मुदत असून, तोपर्यंत आणखी आक्षेप दाखल होण्याची शक्यता आहे.
प्रभाग तयार करताना सत्ताधाऱ्यांना सोयीची रचना केल्याची चर्चा आहे. हिंदूबहुल भागात नावालाच एखादी मुस्लीम वसाहत जोडली आहे. एमआयएमचे कमीतकमी उमेदवार कसे निवडून येतील, यावर भर दिल्याचा आरोपही होत आहे. सात प्रभागांमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ३, ४, ८, ९, १८, २४ आणि २८ क्रमांकाचे हे प्रभाग आहेत. अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असलेल्या प्रभागांत १, ४ आणि ५ चा समावेश आहे.
प्रभाग रचना राजकीय वादात अडकली असून, यात भाजपच्या हस्तक्षेपाचा आरोप विरोधकांनी केला आहे. प्रशासनाला हाताशी धरून भाजपने सत्तेचा गैरवापर करत अनेक प्रभागांत मर्जीतील इच्छुकांसाठी प्रभागरचना केली, असाही आरोप करण्यात आला आहे.
गेल्या ४ दिवसांत आलेल्या हरकतींमध्ये प्रभागरचना आणि नकाशा जुळत नसल्याच्या तक्रारी जास्त आहेत. २६ ऑगस्टपर्यंत ९ हरकती तर गुरुवारी ५ हकरती निवडणूक विभागाने प्राप्त झाल्या. या आक्षेप आणि हरकतींवर निवडणूक विभागाचे अन्य जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी सुनावणी घेतील. तथ्य असलेल्या तक्रारींवर सकारात्मक कार्यवाही होईल.
-मुकुंदवाडीतील पायलटबाबा नगरी हा भाग नकाशात प्रभाग क्रमांक २३ मध्ये दाखवला आहे. प्रत्यक्षात तो प्रभाग क्रमांक २४ मध्ये आहे.
-मेहरनगर प्रभाग क्रमांक २२ मध्ये असून नकाशात तो २७ मध्ये दाखवला आहे.
- शंभूनगर, विभागीय क्रीडा संकुल आणि मयूरबन कॉलनी हे भाग प्रभाग क्रमांक १९ मध्ये असून, नकाशात प्रभाग क्रमांक २० मध्ये दाखवले आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
By City News Desk
Latest News
29 Aug 2025 20:31:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या...