हाताला दोरी बांधून संभाजी कॉलनीत आणले, मस्तवाल ज्ञानेश्वर निमोनेला मान खाली घालून चालताना नागरिकांनी पाहिले!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ६ मधील संभाजी कॉलनीत प्रमोद रमेश पाडसवान (वय ३८) यांच्या हत्‍येत वापरलेला दांडा निमोणे भावांनी समोरील गोठ्यात लपवला होता. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) पोलिसांनी मस्तवाल ज्ञानेश्वर निमोणेला हातात दोरी बांधून संभाजी कॉलनीत आणले. घरी व घरासमोरील गोठ्यात त्याला नेले. गोठ्यातून दांडा जप्त केला. लोकांसमोर ज्ञानेश्वर निमोने मान खाली घालूनच होता. पूर्ण पंचनाम्यात त्‍याने एकदाही मान वर झाली नाही... या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता.

ज्ञानेश्वर काशीनाथ निमोणे, त्याची आई शशिकला, लहान भाऊ गौरव व सौरभ, जावई मनोज दानवे, वडील काशीनाथ यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज, ३० ऑगस्टला संपत आहे. दुपारून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. हत्येत वापरलेला एक दांडा जप्त करणे बाकी असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे हे ज्ञानेश्वरला हाताला दोरी बांधून संभाजी कॉलनीत घेऊन आले होते. काही महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर उज्जैनहून लाकडी दांडा आणला होता. त्यानेच प्रमोद व त्यांच्या वडिलांच्या डोक्यात जबर घाव घातले होते. मान खाली घातलेला ज्ञानेश्वर पाहण्यासाठी बघ्यां’नी गर्दी केली होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पाडसवान कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

अशी केली होती हत्या...
निमोने आणि पाडसवान कुटुंबीय संभाजी कॉलनीत समोरासमोर राहतात. घरासमोरील जागेवर कब्जा मिळविण्यासाठी ज्ञानेश्वर निमोने, त्याचे जुळे भाऊ गौरव, सौरभ, वडील काशीनाथ, आई शशिकला, जावई मनोज दानवे यांनी २२ ऑगस्टला दुपारी १ ला पाडसवान कुटुंबावर हल्ला करत प्रमोद पाडसवान (वय ३८) यांची हत्या केली. त्‍यांचे वडील रमेश पाडसवान (वय ६०) व मुलगा रुद्राक्षवरही (वय १७) चाकूचे सपासप वार करून जखमी केले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी

Latest News

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्‍यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...
तरुणीने दोन दिवसांपूर्वी मोबाइल घेतला, कामावरून घरी येताना दुचाकीस्वाराने हिसकावून ठोकली धूम!, एएस क्लबजवळील घटना
महत्त्वाची बातमी : छ. संभाजीनगरात ‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांत आता रोज एक तास खेळासाठी; जिल्हाधिकारी स्वामी यांची घोषणा
शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software