अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अगरबत्ती विक्रीच्या आड गणेशभक्‍तांचे मोबाइल चोरणाऱ्या ३२ वर्षीय युवकाला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. संशयास्पद हालचालींमुळे त्‍याला पकडले असता त्‍याच्या खिशात चोरीचा मोबाइल आढळला.  त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गजानन महाराज मंदिराजवळ बुधवारी (२७ ऑगस्ट) दुपारी १ च्या सुमारास घडली.

मनिष नेमीलाल गुरजरिया (वय ३२, रा. बजरंगपुरा, इंदौर, मध्यप्रदेश) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. २७ ऑगस्टला दुपारी १ च्या सुमारास अमोल शाहू आव्हाड (वय २८, रा. इंदिरानगर गारखेडा परिसर) हे मित्रांसोबत गजानन महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या स्टॉलवरून गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेले असता मूर्ती विकत घेताना त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात असलेला २१ हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल चोरट्याने चोरला. आव्हाड यांनी घरी कॉल करण्यासाठी मोबाइल बघितला असता दिसला नाही. मोबाइलवर कॉल केला असता बंद दाखवू लागल्याने त्यांची खात्री पटली की मोबाइल कुणीतरी चोरला आहे.

आव्हाड यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास करताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कळले, की गजानन महाराज मंदिराजवळ एका व्यक्तीची संशयास्पद हालचाल दिसत आहे. लगेचच पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार शोन पवार व मारोती गोरे यांनी तत्काळ गजानन महाराज मंदिराजवळ धाव घेतली. संशयित मनिष गुरजरिया याला ताब्‍यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या खिशात आव्हाड यांचा मोबाइल दिसून आला. त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. खिल्लारे, सहायक फौजदार श्री. नलावडे, पोलीस अंमलदार शोन पवार, मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार यांनी ही कारवाई केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software