- Marathi News
- चोर तो चोर अन्... जुना बायजीपुऱ्यात चोराने हद्दच केली...
चोर तो चोर अन्... जुना बायजीपुऱ्यात चोराने हद्दच केली...
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एका चोराने हद्दच केली. दुकान फोडताना सहसा चोर मध्यरात्री किंवा पहाटे साडेचारच्या आतील वेळ निवडतात. पण एका चोराने हद्दच केली. जुना बायजीपुऱ्यातील गंजेशहिदामागे गेटअप फॅब्रिकेशन दुकानासमोर सकाळी साडेसहालाच हा चोर धडकला. दुकानमालक दुकानाशेजारीच राहायला. चोर आला दुकानासमोरील ५ हजार रुपयांचे लोखंडी पाइपचे गेट डोक्यावर उचलले आणि निघाला... ते पाहून दुकानमालक सय्यद अजहर मोहम्मद अली (वय ४८) चक्रावलेच. त्यांनी लहान भाऊ सय्यद अथर सय्यद मोहम्मद अली यांच्यासह चोराकडे धाव घेतली. या वेळी चक्क चोराने त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे दोन्ही भावांनी चोराला पकडून जिन्सी पोलीस ठाण्यात आणले. ही घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Feature : जीवनातील रहस्ये कळतात जिभेवरून
By City News Desk
श्रीमंत-गरीब भेद करणाऱ्या पाडापाडीविरुद्ध छ. संभाजीनगरात मोठा मोर्चा!
By City News Desk
चोर तो चोर अन्... जुना बायजीपुऱ्यात चोराने हद्दच केली...
By City News Desk
मध्यवर्ती बसस्थानकासमोर अंधारात सुरू होती ‘लपाछपी’
By City News Desk
Latest News
09 Aug 2025 15:05:52
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...