आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गोरगरीबांचे पैसे लुटणाऱ्या आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यातील दोन संशयित महिलांना शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रवेश दिला आहे. या दोन्ही संशयित महिला जामिनावर सुटल्या असून, राजाश्रय शोधत होत्या. त्यांना शिंदे गटाने आश्रय दिल्याचे दिसत आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या प्रकाराचा भंडाफोड केला आहे.

शिंदे गटानेही भाजपसारखीच वॉशिंग मशीन सुरू केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. रूपाली शेंडगे आणि सपना निर्मळ या घोटाळ्यातील संशयित महिलांचे शिंदे गटातील प्रवेशाचे फोटो आणि त्यांच्यावरील आरोपपत्र जलील यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आहेत. दरम्यान, या प्रकाराबद्दल मंत्री संजय शिरसाट यांनी हात झटकले असून, या महिलांबाबत मला माहिती नाही. आम्‍ही इतर कार्यकर्त्यांना प्रवेश दिला होता. त्यांच्यासोबत या महिला आल्या असतील, अशी सारवासारव केली आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, की आशिष शेंडगे यांचा मुख्य प्रवेश सोहळा होता. त्यांच्यासोबत कोण आले, याची आम्हाला माहिती नाही. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदर्श पतसंस्थेचे प्रकरण छत्रपती संभाजीनगरसाठी अत्यंत संवेदनशील आहे. या घोटाळ्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software