State News : १३ वर्षांचा संसार, ३ अपत्‍ये तरी दिशाला पडली आसिफ राजाची भूल, दोघांनी चंद्रसेनच्या नाका-तोंडावर उशी दाबली, तडफडून मृत्‍यू

On

नागपूर (सीएससीएन न्यूजडेस्क) : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. पतीच्या हत्येला तिने नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालातून तिच्या क्रूर कृत्‍याचा खुलासा झाला. नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके (३८, साईनाथ सोसायटी, तरोडी खुर्द, वाठोडा, नागपूर) असे […]

नागपूर (सीएससीएन न्यूजडेस्क) : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. पतीच्या हत्येला तिने नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालातून तिच्या क्रूर कृत्‍याचा खुलासा झाला. नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके (३८, साईनाथ सोसायटी, तरोडी खुर्द, वाठोडा, नागपूर) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी दिशा चंद्रसेन रामटेके (वय ३०) व आसिफराजा इस्लाम अन्सारी उर्फ राजा बाबू टायरवाला (वय २८, राजनगर, वाठोडा, नागपूर) अशी संशयितांची नावे आहेत. ४ जुलै रोजी चंद्रसेन हे घरी निपचित पडले असल्याचे दिशाने शेजारच्यांना सांगितले. त्यांनी चंद्रसेन यांचे मोठे बंधू संजय रामटेके (वय ५०) यांना कळविले. संजय तेथे पोहोचले असता चंद्रसेन बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांना इतरांच्या मदतीने त्यांनी मेडिकल इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वाठोडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नातेवाइकांनादेखील चंद्रसेन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने वगैरे झाल्याची शक्यता वाटली. मात्र शनिवारी पोस्टमॉर्टेमचा अहवाल आला आणि पोलिसांनादेखील धक्काच बसला. चंद्रसेन यांचा मृत्यू गळा, नाक, तोंड दाबल्यामुळे झाल्याची बाब समोर आली. हत्येचे प्रकरण असल्याने पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी दिशाची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने हत्या केल्याची बाब कबूल केली.

तिचे आसिफसोबत अनैतिक संबंध होते. मात्र याची माहिती चंद्रसेन यांना कळाली. त्यांनी दिशाला यावरून जाब विचारला व त्यांचे जोरदार भांडण झाले. चंद्रसेन आपल्या मार्गात काटा बनतो आहे, या विचारातून दोघांनीही त्यांना संपविण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दिशाने आरोपी आसिफला चूपचाप घरात घेतले. झोपलेल्या चंद्रसेन यांचा गळा आवळला व दोघांनीही त्यांच्या नाका-तोंडावर उशी दाबून ठेवली. जीव गुदमरल्याने चंद्रसेन यांचा तडफडून मृत्यू झाला. संजय यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

तेरा वर्षांपूर्वी चंद्रसेन आणि दिशा यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. चंद्रसेनला काही वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका बसला. त्यानंतर दिशाने स्वतःचा मिनरल वॉटर तयार करण्याचा प्लांट सुरू केला. त्यातून दररोज कॅन विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान वाठोड्यातील महामार्गावर असलेल्या राजा इस्लाम अन्सारी याच्याशी तिचे सूत जुळले. राजाचे पंक्चर दुरुस्तीचे दुकान होते. सुरुवातीला मैत्री झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software