State News : इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या प्रियकराने लैंगिक शोषण केले, पण लग्‍नास नकार!

On

नागपूर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्‍नाच्या आमिषाने २३ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाविरुद्ध नागपूरच्या वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती. तरुणी तरुणी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फैजान अन्सारी उर्फ अबरार अन्सारी (वय २५, वाठोडा) असे संशयिताचे नाव आहे. इन्स्टाग्रामच्या […]

नागपूर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्‍नाच्या आमिषाने २३ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाविरुद्ध नागपूरच्या वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती. तरुणी तरुणी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

फैजान अन्सारी उर्फ अबरार अन्सारी (वय २५, वाठोडा) असे संशयिताचे नाव आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याची २३ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. काही दिवसांनी ते व्हॉट्सअॅपवर बोलू लागले आणि त्यांच्यात मैत्री झाली. ते नियमित भेटू लागल्यावर फैजानने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्न करण्याचे आमिष दाखविले. २६ जुलै २०२० ते ५ मे २०२५ या कालावधीत त्याने लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. मात्र लग्नाचा विषय काढल्यावर तो टाळाटाळ करायचा. त्याने मे महिन्यात तिच्याशी लग्न करणार नसल्याचे तिला सांगितले आणि ती चांगलीच हादरली. तिने वाठोडा पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. पोलिसांनी फैजानच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software