- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- रोखठोक : पोलिसांच्या आई-बहिणीच्या पार्श्वभागाचा उल्लेख करणाऱ्या चौधरीच्या पार्श्वभागावर लाथ नाही घाल...
रोखठोक : पोलिसांच्या आई-बहिणीच्या पार्श्वभागाचा उल्लेख करणाऱ्या चौधरीच्या पार्श्वभागावर लाथ नाही घालायची तर काय आरती करायची?, नक्की काय घडलं होतं, ज्यामुळे DYSP कुलकर्णींची उद्विग्नता वाढली...
On

जालना (विशेष प्रतिनिधी) : पोलीस घेऊन जात असलेल्या व्यक्तीस मागून येऊन पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी हे लाथ मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांनीही अत्यंत ठळकपणे याबद्दलचे वृत्त दिले. त्यामुळे कुलकर्णी यांच्याबद्दल जितका रोष निर्माण करता येईल तितका काही मंडळींनी करण्याचा प्रयत्न केला. पण नक्की घडलं काय होतं, कशामुळे हा सगळा उद्वेग कुलकर्णी यांच्याकडून व्यक्त झाला, यामागचं चित्र पडद्यामागेच राहिलं आहे... त्याआधी बरंच काही घडलं होतं, जे समजून घेतल्यानंतर, कुलकर्णी यांनी जे केलं, कुणीही तेच केलं असतं, हेच समोर येतं... विशेष वृत्तांत...
पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी यांची पोलीस दलात ३२ वर्षे सेवा झाली आहे. ते आजवर कोणत्याही वादात सापडलेले नाहीत. राष्ट्रपती पदकप्राप्त अधिकारी आहेत. नक्षलग्रस्त भागात त्यांनी बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख आजही अभिमानाने होतो. क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. तीन कोटी रुपयांचा दरोड्याचा गुन्हा त्यांनी ज्या पद्धतीने उघडकीस आणला, ते पोलीस दलासाठी उदाहरण बनले आहे. अवैध धंद्यांवर ते सातत्याने करत असलेल्या कारवायामुळे ते चर्चेत असतात. बावणे पांगरी येथे घडलेला दलित- सवर्ण संघर्ष त्यांनी ज्या सामोपचाराने सोडवला, त्याचेही कौतुक झाले होते. जमिनीची विभागणी करून बौद्ध विहाराला त्यांनी जागा मिळवून दिली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
३०-३० घोटाळा : सूत्रधाराचा जिवलग मित्र सुदाम चव्हाण अटकेत!
By City News Desk
Latest News
20 Aug 2025 22:14:59
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्याच्या...