गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्‍ज : जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, संयम अन्‌ समन्वयाने बाप्पाचा उत्सव साजरा करू!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणेशोत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. पोलीस प्रशासन व गणेश मंडळांनी संपर्क, संयम आणि समन्वयाने उत्साहात गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आज, २० ऑगस्टला झाली. त्‍यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेची काळजी, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच विसर्जनासाठी करण्यात आलेल्या विशेष नियोजनाबाबत संबंधित विभागांना सूचना जिल्हाधिकारी  स्वामी यांनी दिल्या. गणेश मूर्तींच्या आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेशा संख्येने बंदोबस्त ठेवण्यात यावा.

विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक नियमन करावे, विसर्जनासाठी नद्या, तलाव तसेच कृत्रिम तलावांवर पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. उत्सवाच्या काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार याची विशेष काळजी घेण्यात यावी. स्वच्छता मोहीम राबवून पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करावी. पर्यावरणपूरक मूर्ती व नैसर्गिक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. उत्सवाचा काळात जिल्ह्यातील संपूर्ण सार्वजनिक गणेश मंडळाची संपर्क यादी अद्ययावत करून पोलीस प्रशासनाने मंडळाच्या संपर्कात राहावे. तसेच अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी, यात मिठाई, मोदक, नैवद्य, भेसळयुक्त पदार्थ तसेच दुकानावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही या वेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना

Latest News

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्‍हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्‍याच्या...
दुचाकी चोरून भावाला वापरायला दिली... चोरीच्या दुचाकीसह २२ वर्षीय तरुणाला अटक, वाळूज MIDC पोलिसांची कारवाई
शासकीय अधिकाऱ्याला भामट्याने असा लावला चुना!; तुम्‍हीही अलर्ट राहा..., शहागंजमध्ये घडली ही घटना 
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
मुकुंदवाडीत टवाळखोराने आधी कार फोडली, नंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लुटले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software