खडकेश्वरच्या मालखरे विहारमध्ये भरदिवसा चोरट्यांचा धुमाकूळ; ३ घरे फोडली, दागिने, रोकडे लांबवली

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खडकेश्वरमधील मालखरे विहारमध्ये भरदिवसा चोरट्यांनी धुमाकूळ घालत ३ घरे फोडली. एका घरातून ३ हजार रुपये रोख, तर दुसऱ्या एका घरातून दागिने, रकमेसह ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सिटी चौक पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ॲड. दिपांजन माधव जाधव (वय ३५, मालखरे विहार, मराठवाडा सांस्कृतिक मंडळासमोर खडकेश्वर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.  ते बहीण डॉ. भैरवी माधव जाधव व मावशी मनिषा साळुंके यांच्यासह राहतात. मंगळवारी (१९ ऑगस्ट) त्‍यांची बहीण डॉ. भैरवी जाधव या दुपारी दोनला राहत्‍या घरून घाटी रुग्णालयात ड्युटीसाठी गेल्या. त्‍यांनी घराला कुलूप लावुन घेतले होते. रात्री आठला ॲड. जाधव आणि त्‍यांची मावशी घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडी व कोयंडा तुटलेला दिसला. कडीला कुलूप टांगलेले दिसले. ते दरवाजा उघडून घरात गेले. बेडरूममध्ये पाहिले असता कपाटातून रोख रक्कम व दागिने गायब होते.

रात्री पावणेदहाला त्‍यांची बहीणही घरी आली. रात्री १० ला पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक श्री. खरात व ठसेतज्‍ज्ञांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर ॲड. जाधव यांना कळले, की त्‍यांच्या शेजारील फ्लॅट क्र. ३०३ व ३०६ चेही कुलूप तुटलेले असून चोरी झालेली आहे. नंदकिशोर सहारे यांच्या घरातून ३ हजार रुपये तर अरुण कर्डिले यांच्या फ्लॅटचे लॉक तोडलेले आहे. ॲड. जाधव यांच्या घरातून चोरट्यांनी ३५ हजार रुपये रोख, प्रत्‍येकी १८ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १ हजार रुपयांची ब्राऊन रंगाची लॅपटॉपची बॅग ज्यात बाँड पेपर, शेतीचे खरेदीखत व इतर कागदपत्रे होती. असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनिषा हिवराळे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना

Latest News

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्‍हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्‍याच्या...
दुचाकी चोरून भावाला वापरायला दिली... चोरीच्या दुचाकीसह २२ वर्षीय तरुणाला अटक, वाळूज MIDC पोलिसांची कारवाई
शासकीय अधिकाऱ्याला भामट्याने असा लावला चुना!; तुम्‍हीही अलर्ट राहा..., शहागंजमध्ये घडली ही घटना 
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
मुकुंदवाडीत टवाळखोराने आधी कार फोडली, नंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लुटले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software