३०-३० घोटाळा : सूत्रधाराचा जिवलग मित्र सुदाम चव्हाण अटकेत!

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ३०-३० घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सुदाम मानसिंग चव्हाण (वय ४०, रा. निलजगाव, बिडकीन) याला अटक केली आहे. तो  घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार संतोष ऊर्फ सचिन राठोड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड (रा. मुंडवाडी, ता. कन्नड) याचा जिवलग मित्र असून, संतोषने त्‍याला १८ कोटी रुपये पाठवले होते. सुदामला न्यायालयात हजर केले असता २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

अवघ्या राज्‍याला हादरवून टाकणारा ३०-३० घोटाळा नोव्हेंबर २०२१ मध्ये समोर आला होता. २०२१ मध्ये या घोटाळ्यात पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला तेव्हा सुदामला पोलिसांनी अटक केली होती. मात्र मूळ तक्रारदारांनी जबाब मागे घेतल्याने त्याची कारागृहातून सुटका झाली होती. ६० तक्रारदारांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नव्याने तक्रार केल्याने आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा सुदामच्या मुसक्या आवळल्‍या आहेत.

काय आहे घोटाळा?
संतोषने २०१६ मध्ये मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी जमिनी गेलेल्या भागातील शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं. सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला ५ टक्क्यांनी परतावा देण्याचं मार्केटिंग केलं. नंतर मात्र संतोषने पुढे महिन्याला २५ टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरुवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत ३०-३० नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यांमधून पैसे आणले जाऊ लागले, त्यामुळे लोकांचाही या भामट्यावर आंधळा विश्वास बसला. पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे ३० गावांतील शेतकरी संतोषने जाळ्यात ओढले. महत्त्वाची बाब म्हणजे, काही राजकीय नेत्यांनीसुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्यानं शेतकऱ्यांनासुद्धा विश्वास बसला होता. उरल्या सुरल्या लोकांनीसुद्धा कोट्यावधी रुपये अधिकचं व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले होते. नंतर संतोष फरारी झाला. व्याज तर दूरच, पण मुद्दल मिळणेही शेतकऱ्यांना अवघड झालं.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना

Latest News

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्‍हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्‍याच्या...
दुचाकी चोरून भावाला वापरायला दिली... चोरीच्या दुचाकीसह २२ वर्षीय तरुणाला अटक, वाळूज MIDC पोलिसांची कारवाई
शासकीय अधिकाऱ्याला भामट्याने असा लावला चुना!; तुम्‍हीही अलर्ट राहा..., शहागंजमध्ये घडली ही घटना 
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
मुकुंदवाडीत टवाळखोराने आधी कार फोडली, नंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लुटले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software