जगण्याचे छळले होतेच, मृत्‍यूनंतर क्रांतीचौक पोलिसांनीही ‘ताटकळत’ ठेवले..., ७ तास मृतदेह घाटीत पंचनाम्याविना, कुटुंबीयांचा संताप!

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वरूड खुर्द (ता. जाफराबाद) येथील रामेश्वर जगन गाढे (वय ४७) या दिव्यांग तरुणाचा मृतदेह पंचनाम्याविना ७ तास पोलिसांच्या प्रतीक्षेत होता. पोलिसांनी रामेश्वरच्या कुटुंबाला व्हीआयपी प्रोटोकॉल बंदोबस्ताचे कारण देत ताटकळत ठेवले. अखेर २ वाजता पोलिसांनी घाटी रुग्णालयात जाऊन प्रक्रिया पार पाडली. नंतर उत्तरीय तपासणी होऊन सायंकाळी ६:३० वाजता मृतदेह घेऊन कुटुंबीय गावाकडे रवाना झाले. पहाटे मृत्‍यू झाल्यानंतर तब्बल सात तास पोलिसांनी वाट पाहायला लावली. यामुळे तरुणाच्या रामेश्वरच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.

रामेश्वर मोलमजुरी करायचे. आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. सोमवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी दुचाकीने घरी परतताना माहोरा गावाजवळ अपघात होऊन त्‍यांना बाबा पेट्रोलपंप चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी (१९ ऑगस्ट) पहाटे मृत्यू झाला. शवविच्छेदन व पंचनाम्यासाठी क्रांती चौक पोलिसांना रुग्णालयाकडून कळविण्यात आले होते. मंगळवारी शहरात उच्चपदस्थ व्यक्तींचे दौरे होते. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त लावण्यात आला होता.

सकाळी १० पासून चौका-चौकांत पोलीस तैनात होते. रामेश्वर यांचे नातेवाईक क्रांती चौक ठाण्यात गेले तेव्हा एका पोलीस अंमलदाराने वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर कॉल करून पंचनाम्यासाठी बोलावल्याबद्दल या कुटुंबावरच राग काढला. पंचनाम्याशिवाय शवविच्छेदनाला विलंब झाला. क्रांती चौक पोलीस ठाण्यातील अंमलदार एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. अखेर २ वाजता वरिष्ठांना ही बाब कळल्यानंतर जबाबदारी नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना

Latest News

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्‍हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्‍याच्या...
दुचाकी चोरून भावाला वापरायला दिली... चोरीच्या दुचाकीसह २२ वर्षीय तरुणाला अटक, वाळूज MIDC पोलिसांची कारवाई
शासकीय अधिकाऱ्याला भामट्याने असा लावला चुना!; तुम्‍हीही अलर्ट राहा..., शहागंजमध्ये घडली ही घटना 
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
मुकुंदवाडीत टवाळखोराने आधी कार फोडली, नंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लुटले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software