- Marathi News
- सिटी डायरी
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न आल्याने अधिकाऱ्यांनीच उरकले जलपूजन, अधिकृत लोकार्पण सोहळा लवकरच : मनपा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न आल्याने अधिकाऱ्यांनीच उरकले जलपूजन, अधिकृत लोकार्पण सोहळा लवकरच : मनपा आयुक्त, शहराला वाढीव योजनेचे पाणी येणे सुरू...
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुंबईतील पावसामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द केला. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा घेण्याऐवजी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात अधिकाऱ्यांनीच जलपूजन केले आणि लगेचच शहराला या योजनेचे पाणी मिळायला सुरुवात झाली आहे. या योजनेचे अधिकृत लोकार्पण लवकरच होईल, असे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले. शहराला २६ एमएलडी पाणी जास्त मिळणार असल्याने रोज आता १७५ एमएलडी पाणी शहराला मिळेल. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा टप्पा एक ते दोन दिवसांनी कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शहराला आठ ते दहा दिवसांनी तर कुठे १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तो आता किती दिवसांवर येईल, याबद्दलची आशा नागरिकांना लागली आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ऑक्टोबरपर्यंत नवी योजना कार्यान्वित होईल, असा दावा केला जात आहे. मात्र एकूणच प्रशासकीय कार्यपद्धती आणि योजनेत येणाऱ्या अडचणी पाहता नव्या योजनेचे पाणी नव्या वर्षात मिळेल की ऑक्टोबरपर्यंत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितले, की नवी योजना सुरू झाली की शहरात तब्बल ३७१ एमएलडी पाणी दाखल होईल. त्यानंतर अगदी नव्या वसाहतींमध्येही पाणीपुरवठा केला जाईल. सातारा देवळाई, पैठण रोडवरील महापालिकेच्या हद्दीपर्यंतचा रहिवासी भाग, पडेगाव रोड, हर्सूल भागातील नवीन वसाहती, जटवाडा रोडवरील अंबर हिलपर्यंत, मकबरामागील गोगाबाबा टेकडीपर्यंत, चिकलठाणा परिसरातील नवीन वसाहतींनाही पाणी मिळेल, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
३०-३० घोटाळा : सूत्रधाराचा जिवलग मित्र सुदाम चव्हाण अटकेत!
By City News Desk
Latest News
20 Aug 2025 22:14:59
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्याच्या...