छ. संभाजीनगरहून ३ दिवसांपूर्वी गावी आलेल्या युवकाची आत्‍महत्‍या, कन्‍नड तालुक्‍यातील घटना

On

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : नेवपूर (ता. कन्‍नड) येथील ३५ वर्षीय समाधान सर्जेराव खेळवणे या शेतकरी पुत्राने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी सहाला समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पिशोर पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

समाधान हे कामधंद्यानिमित्त काही वर्षांपासून पत्नी व मुलीसह छत्रपती संभाजीनगरमध्ये राहायला होते. तीन दिवसांपूर्वी नेवपूरला गावी आले. सोमवारी (१८ ऑगस्ट) रात्री आईसोबत जेवण केल्यानंतर ते बाजूलाच असलेल्या घरात झोपायला गेले. आई व लहान भाऊ लागूनच असलेल्या दुसऱ्या घरात झोपले होते. मध्यरात्री कधी तरी समाधान यांनी छताच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी नळाला पाणी आल्यामुळे लहान भाऊ त्यांना उठवण्यासाठी गेला असता समाधान यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्‍यांना करंजखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दुपारी दोनला त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना

Latest News

SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना SHOCKING : होमवर्क केला नाही म्‍हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्‍हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्‍याच्या...
दुचाकी चोरून भावाला वापरायला दिली... चोरीच्या दुचाकीसह २२ वर्षीय तरुणाला अटक, वाळूज MIDC पोलिसांची कारवाई
शासकीय अधिकाऱ्याला भामट्याने असा लावला चुना!; तुम्‍हीही अलर्ट राहा..., शहागंजमध्ये घडली ही घटना 
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
मुकुंदवाडीत टवाळखोराने आधी कार फोडली, नंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लुटले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software