छत्रपती संभाजीनगर ATS ची मध्यप्रदेशमध्ये मोठी कारवाई : गणेश विसर्जनाला घातपात घडविण्याच्या तयारीतील जलील खिलजीला अटक; हिमायतबाग गोळीबार प्रकरणातील खलीलचा आहे भाऊ

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गणेश विसर्जनाला घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या जलील अकील खिलजी (वय ३४, रा. गुलमोहर कॉलनी, खंडवा, मध्यप्रदेश) याला छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या पथकाने खंडवा येथे मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री अकराला पकडले. त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा, ७ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. सोमवार-मंगळवार असे दोन दिवस एटीएस पथक जलीलच्या शोधात तळ ठोकून होते.

सुरुवातीला दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे सर्व तरुण कहारवाडी आणि गुलमोहर कॉलनी परिसरातील रहिवासी आहेत. रात्रभर चाललेल्या चौकशीनंतर बुधवारी (३ सप्‍टेंबर) सकाळी यापैकी तिघांना सोडण्यात आले, तर जलीलला अटक करण्यात आली. जलील हा छत्रपती संभाजीनगर शहरातील हिमायतबाग परिसरात २०१२ साली एटीएसवर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील आरोपी खलील अकील खिलजीचा भाऊ आहे.

सिमीचा स्लीपर सेल देशात पुन्हा सक्रिय झाल्यामुळे तपास यंत्रणा या नेटवर्कचा तपास करण्यात गुंतल्या आहेत. खांडवा पूर्वी सिमीचा बालेकिल्ला होता. त्यामुळेच आयबी, एनआयए आणि महाराष्ट्रातील एटीएस खांडवा येथील कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. खंडवा एसपी मनोज कुमार राय म्हणाले की, सिमीशी संबंधित माजी सदस्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एटीएसकडून बरेच इनपुट मिळाले आहे. जलीलची कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. जलीलचा पिता अकील खिलजी हा सिमीचा खंडवा जिल्हाप्रमुख होता.

जलीलचा भाऊ खलीलने छत्रपती संभाजीनगर शहरातील हिमायतबाग परिसरात २६ मार्च २०१२ रोजी एटीएसवर गोळीबार केला होता. त्याचे पूर्ण नाव मोहम्मद शाकीर हुसेन उर्फ खलील अकील खिलजी आहे. या चकमकीत त्याचा एक साथीदार जागीच ठार झाला, इतर दोन अटक झाले होते. २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने खलील अकील खिलजी व अब्रार उर्फ मुन्ना यांना दोषी ठरवत १० वर्षांची कडक कारावासाची शिक्षा सुनावली होती. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)

Latest News

बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह) बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खासदारकी नसली तरी अजूनही चंद्रकांत खैरे हे खासदार असल्यासारखेच वावरत असतात. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचा मान...
Tech News : फोन चार्जिंग करताना वापरत असाल तर सावधान!
Beauty Feature : आता घरीच करा हेअर स्पा!; पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, १०० रुपयांत हजार रुपयांचे काम होतील
Adhyatm : चंद्रग्रहणाने सुरू होतेय श्राद्ध; जाणून घ्या ग्रहणात श्राद्ध तर्पणचा नियम काय?
एका युवकासोबतची छायाचित्रे व्हायरल झाल्याने महिला हादरली!; सायबर पोलिसांनी शोधून काढले बदनामी करणारे दोघे!, छ. संभाजीनगरची धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software