पत्रकार महिलेला नग्न करून मारण्याची धमकी!; पुंडलिकनगर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ४ भागात राहणाऱ्या ५४ वर्षीय पत्रकार महिलेला नग्न करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी (३ सप्‍टेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

एका ४२ वर्षीय ब्रोकरचा आणि महिलेकडे भाड्याने राहणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्‍तीचा संशयितांत समावेश आहे. महिलेने तक्रारीत म्हटले, की त्या २५ वर्षांपासून पत्रकार असून, त्यांचा माय वर्ल्ड, चिकलठाणा येथे फोर बीएचके फ्लॅट आहे. एप्रिल २०२५ मध्ये त्‍या कामानिमित्त ठाणे (मुंबई) येथे गेल्या असता ब्रोकरने कॉल करून त्याच्या नातेवाइकासाठी फ्‍लॅट भाड्याने देण्याबद्दल विचारणा केली.

फ्लॅटचे भाडे ४२ हजार महिना व १ लाख रुपये डिपॉजिट असे ठरवले. ३० एप्रिल २०२५ रोजी ब्रोकरचा नातेवाइक सपत्नीक राहायला आला. मात्र याने अलीकडच्या काळात भाडेच दिले नाही. महिलेने वारंवार कॉल व व्हॉट्स ॲप मेसेजेस करून भाडे मागितले. मात्र त्यांनी दिले नाही. ८ मे रोजी ब्रोकर महिलेकडे आला. घर शिफ्टींगसाठी, घराच्या क्लिनिंग व ट्रॉली मेंटेनन्ससाठी पैसे लावले. ते पैसे आधी परत करण्यास त्याने सांगितले. मेसेज करून तू मूर्ख बाई आहेस, असे म्हणून शिवीगाळ केली.

१७ ऑगस्टला महिलेने पुन्हा भाडेकरूला कॉल करून घर खाली करायची विनंती केली असता त्याने फोनवर तू या फ्लॅटवर येऊन तर बघ तुला भोंगळ करून मारेल, असे बोलून अश्लील शिवीगाळ करून ब्रोकरला पाठवून तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. घराचे भाडे देत नसल्यामुळे व घरही खाली करत नसल्यामुळे मला मानसिक त्रास होत असल्यामुळे पोलिसांत तक्रार करत असल्याने महिलेने म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशव कासारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software