ब्‍युटीपार्लरवालीसोबत पतीचे अफेअर, विवाहितेचा आरोप, घरातून हाकलून दिल्याने माहेरी छत्रपती संभाजीनगरला राहते, जवाहरनगर पोलिसांना सांगितली लग्नापासूनची आपबिती!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ब्‍युटी पार्लरवालीसोबत पतीचे अफेअर असल्याने त्याच्याकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असून, घर बांधकामासाठी ५ लाख रुपये माहेरावरून आणण्यास सांगण्यात येत आहे. घरातून हाकलून दिल्याची तक्रार २६ वर्षीय विवाहित तरुणीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी तिचा पती, सासू, जेठ, जेठानी, ३ नणंदांविरुद्ध बुधवारी (३ सप्टेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

सध्या माहेरी गारखेड्यातील प्रियदर्शनी कॉलनीत राहणाऱ्या तरुणीचे लग्न २२ मे २०१७ रोजी सेलूद (ता. भोकरदन) येथील एका व्यापाऱ्यासोबत झाले होते. लग्नानंतर दोन ते तीन महिने तिला सासरच्यांनी चांगले वागवले. नंतर पती, सासू, जेठ, जेठानी, ३ नणंदा म्हणू लागल्या, की तुझ्या आई-वडिलांनी लग्न चांगले केले नाही. मानपान दिला नाही. विवाहितेच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्यांना समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी थोडे दिवस विवाहितेला चांगले वागवले. तिला पतीपासून दोन मुली झाल्या. त्यानंतर सासरच्यांनी तुला मुलीच का झाल्या, मुलगा का झाला नाही, असे म्हणून तिला शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

तू घर बांधण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून तिला पती, सासू, जेठ, जेठानी, ३ नणंदा मारहाण करू लागले. याचदरम्यान विवाहितेला कळले, की तिच्या पतीचे भोकरदन तालुक्यातीलच एका गावात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. विवाहितेने याबद्दल विचारणा केली असता पतीने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे वाढवले. ४ एप्रिल २०२५ रोजी तिला घरातून हाकलून दिले. तेव्हापासून ती माहेरी छत्रपती संभाजीनगरला राहत आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अनिता उपाधे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संशयावरून वाळूज MIDC तील ओॲसिस चौकात पोलिसांनी ट्रक पकडला, समोर आला मोठाच घोळ!!

Latest News

संशयावरून वाळूज MIDC तील ओॲसिस चौकात पोलिसांनी ट्रक पकडला, समोर आला मोठाच घोळ!! संशयावरून वाळूज MIDC तील ओॲसिस चौकात पोलिसांनी ट्रक पकडला, समोर आला मोठाच घोळ!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलीस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पुण्याहून भंगार जालन्याला नेणारा ट्रक वाळूज एमआयडीसीतील ओॲसिस चौकात पोलिसांनी पकडला. या भंगाराची...
गणेश विसर्जनाच्या आनंदावर विरजण पाडण्याचा कट रचणाऱ्या तिघांवर मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई ; देशी दारूचा मोठा साठा जप्त
गणपती पाहून परतणाऱ्या व्यावसायिकावर चाकूहल्ला!; चिकलठाण्यातील घटना
सुसाट कारने स्कुटीस्वार शिक्षिकेला उडवले, सेंट्रल नाका चौकातील घटना
बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software