- Marathi News
- पॉलिटिक्स
- व्हिडीओ : तुमचं पोरगं असतं तर तुम्ही काय केलं असतं, जीव नसता घेतला काम करणाऱ्यांचा..., मंत्री शिरसाट...
व्हिडीओ : तुमचं पोरगं असतं तर तुम्ही काय केलं असतं, जीव नसता घेतला काम करणाऱ्यांचा..., मंत्री शिरसाट कंत्राटदारावर खवळले!, खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण, FIR दाखल करण्याचे आदेश
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहर पाणी योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी कंत्राटदाराने देवळाई परिसरात खोदलेल्या म्हाडा कॉलनीतील मोठ्या खड्ड्यात पडून ३ सप्टेंबरला ईश्वर संदीप भास्कर (वय साडेतीन वर्षे) या चिमुकल्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (५ सप्टेंबर) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी केली तेव्हा कंत्राटदारावर चांगलाच संताप व्यक्त केला. तुमचं पोरगं असतं तर तुम्ही काय केलं असतं, जीव नसता घेतला काम करणाऱ्यांचा... अशा शब्दांत त्यांनी उद्वेग व्यक्त केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धारत कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. उपअभियंता पूजा जाधव यांनी खड्डे बुजविण्याचे आदेश कंत्राटदाराला दिल्याची माहिती दिली. शहर पाणी योजनेतून शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र कंत्राटदार सुरक्षेच्या उपाययोजना करत नसल्याने अपघात घडत आहेत. कुठेही बॅरिकेट, रिफ्लेक्टर रिबीन लावलेल्या दिसत नाहीत, अशी तक्रार नागरिकांनी केली. पहा व्हिडीओ :