रेशनच्या अपेक्षेने गमावले २५ हजारांचे दागिने!; दोन भामट्यांनी महिलेला असे गंडवले, की कुणाचे डोके चक्रावून जाईल... सिडको एन ४ च्या कामगार चौकात काय घडलं...

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आमचे मालक रेशन वाटप करत आहेत, तुम्ही इथेच बसा, दागिने काढून ठेवा, असे म्हणत दोन भामट्यांनी एका महिलेचे दागिने हालचलाखीने गायब केले. ही घटना सिडको एन ४ च्या कामगार चौकाजवळ बुधवारी (३ सप्‍टेंबर) सायंकाळी घडली. पुंडलिकनगर पोलिसांनी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रेखा रस्तुम चिमणे (वय ५५, रा. जयभवानीनगर, दुर्गा माता मंदिर गल्लीत) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती, मुलगा व सुनेसह राहतात. त्या विश्वकर्मा इंग्लिश स्कूल, कैलासनगर येथे सफाई कामगार आहेत. त्यांचा मुलगा खासगी नोकरी करतो. बुधवारी सायंकाळी साडेपाचला त्या कामावरून घरी परतण्यासाठी आकाशवाणी येथून रिक्षात बसल्या. सिडको बसस्टँडवर सायंकाळी सहाला उतरल्या. तिथून पायी रस्ता ओलांडून कामगार चौकाकडे येत असताना ओम साई मोबाईल शॉपीच्या बाजूला गेटसमोर दोन व्यक्‍तींनी (अंदाजे ३० ते ३५ वयाचे) रेखा यांच्याकडे आले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, की तुम्ही येथे खाली बसा. आमचे मालक येत आहेत. तुम्हाला रेशन देणार आहेत.

तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातले काढा व तुमच्या जवळील रुमालात ठेवा, असे म्हणाले. रेशन मिळण्याच्या आशेने रेखा यांनी सोन्याची पोत व कानातले काढून डोक्याला बांधलेल्या स्कार्फमध्ये ठेवले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली लाल पिशवी रेखा यांच्याकडे दिली. म्हणाले, की हे मुलांना खायला घेऊन जा. रेखा यांच्या हातातील दागिने असलेला स्कार्फ घेऊन बांधण्याचे नाटक केले व स्कार्फ रेखा यांच्याकडे दिला व तेथून निघून गेले. रेशन मिळण्याच्या अपेक्षेने रेखा या तिथेच बसून होत्‍या. अखेर रात्री आठला त्‍या घरी जाण्यास निघाल्या. घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले, की स्कार्फमध्ये सोन्याची पोत व सोन्याचे कानातले दागिने नव्हते. त्‍या दोन भामट्यांनी ते हालचलाखीने काढून घेतले होते. त्‍यात १५ हजारांचे मनी मंगळसूत्र, १० हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स असे एकूण २५ हजारांचे दागिने होते. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील मस्के करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संशयावरून वाळूज MIDC तील ओॲसिस चौकात पोलिसांनी ट्रक पकडला, समोर आला मोठाच घोळ!!

Latest News

संशयावरून वाळूज MIDC तील ओॲसिस चौकात पोलिसांनी ट्रक पकडला, समोर आला मोठाच घोळ!! संशयावरून वाळूज MIDC तील ओॲसिस चौकात पोलिसांनी ट्रक पकडला, समोर आला मोठाच घोळ!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलीस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पुण्याहून भंगार जालन्याला नेणारा ट्रक वाळूज एमआयडीसीतील ओॲसिस चौकात पोलिसांनी पकडला. या भंगाराची...
गणेश विसर्जनाच्या आनंदावर विरजण पाडण्याचा कट रचणाऱ्या तिघांवर मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई ; देशी दारूचा मोठा साठा जप्त
गणपती पाहून परतणाऱ्या व्यावसायिकावर चाकूहल्ला!; चिकलठाण्यातील घटना
सुसाट कारने स्कुटीस्वार शिक्षिकेला उडवले, सेंट्रल नाका चौकातील घटना
बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software