- Marathi News
- सिटी क्राईम
- पहाडसिंगपुऱ्यात पोलिसांनी सापळा रचून मांडूळ तस्कराच्या आवळल्या मुसक्या!; बास्केटमध्ये आढळले अडीच फुट...
पहाडसिंगपुऱ्यात पोलिसांनी सापळा रचून मांडूळ तस्कराच्या आवळल्या मुसक्या!; बास्केटमध्ये आढळले अडीच फुटांचे मांडूळ!!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर गुन्हे शाखेने बेगमपुरा परिसरातील पहाडसिंगपुऱ्यात गुरुवारी (४ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास सापळा रचून मांडूळ तस्कराला अटक केली. त्याच्याकडील मांडूळ जप्त करून वनविभागाकडे सोपवले आहे. विजय रमेश काळे (वय ३२, रा. पार्वतीनगर, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा) असे या तस्कराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शिंदे यांनी सहकाऱ्यांसह मिळून पहाडसिंगपुरा गाठले. बौध्द लेणीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून थांबले. विजय काळे हा लाल प्लास्टिक बास्केटसह प्रतिकेश्वर मल्टीपर्पज इंटरप्राईजेस समोरून बौध्दलेणीकडे पायी जाताना रात्री साडेनऊला दिसला. पोलिसांनी त्याला कळू न देता अचानक त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडील बास्केटमध्ये काळसर तपकिरी रंगाचे अंदाजे अडीच फूट लांबीचे मांडूळ आढळले. हे पोलिसांनी मांडूळ देखरेख व सुरक्षेसाठी वनरक्षक दामू पवार यांच्याकडे सुपूर्द केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस अंमलदार योगेश नवसारे, मनोज विखणकर, राहुल बंगाळे, मंगेश शिंदे यांनी केली.