- Marathi News
- पॉलिटिक्स
- बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्...
बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खासदारकी नसली तरी अजूनही चंद्रकांत खैरे हे खासदार असल्यासारखेच वावरत असतात. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचा मान घेण्यासाठी ते पुढेच असतात. त्यामुळे सध्या पदावर असलेल्यांना संधीच मिळत नाही. धार्मिक कार्यक्रम असल्याने थेट विरोधही करता येत नाही. ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या आरतीवेळीही तोच प्रकार घडला. खैरे हे आरतीसाठी पुढे येऊन आरतीचं ताट हातात घेतलं. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट मागे राहिले अन् त्यांची नाराजी लगेचच दिसून आली. त्यावर बाकीच्यांनी पुढे या, असे म्हटले. तरीही शिरसाट पुढे यायला तयार नव्हते. तुम्हीच करून घ्या, मी मागे थांबतो, असे ते म्हणाले. मात्र नंतर ते पुढे आले, दुसरं आरतीचं ताट हातात घेतलं अन् खैरेंच्या हे मागून सर्व कानावर पडत असल्याने त्यांनी शिरसाटांना काय झालं, असं दरडावणीच्या स्वरात विचारलं, पण शिरसाटांनी प्रत्युत्तर न देता, आरतीला प्राधान्य दिलं... या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शहरात चवीने चर्चा होत आहे.