अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. १२ ते १५ मार्च असे सलग ४ दिवस त्यांना मध्यरात्री कॉल करून अनोळखी व्यक्ती शिवीगाळ करून धमक्यात देत आहे. सुरुवातीला ही बाब दानवे यांनी गांभीर्याने घेतली नाही. मात्र रविवारी (१५ मार्च) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास ‘कापून टाकू, ठोकून टाकू’, अशी धमकी मिळाल्यानंतर दानवे यांनी सोमवारी (१६ मार्च) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिली. तक्रारीवर पोलीस तपास सुरू झाला आहे.

पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र, मी अनेकदा प्रवासात असतो, घरी माझे कुटुंब असते. त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये, ही माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे संशयित क्रमांक देऊन तक्रार केली आहे. २० फेब्रुवारीला दानवे यांची यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेतली होती. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद किंवा विधान परिषद सदस्यत्व राहिले नसल्याने राज्य शासनाच्या गृह विभागाने तसा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंधराच दिवसांनी अशाप्रकारच्या धमक्या सुरू झाल्या आहेत. दानवे यांनी स्वतःहून सुरक्षा मागितलेली नाही. मात्र या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. या धमक्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे का, हे तपासानंतरच समोर येईल. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software