महाराष्ट्र पुन्हा हादरला : बदलापुरात ४ वर्षीय चिमुकलीवर स्‍कूलव्हॅन चालकाकडून लैंगिक अत्याचार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

ठाणे (मेट्रोपोलिस वृत्तसेवा) : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या चार वर्षीय मुलीवर तिच्या स्‍कूल व्हॅन चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून, यावेळी त्या मुलीला मारहाणदेखील करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या घटनेमुळे बदलापूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत शिकणारी चार वर्षांची चिमुकली नेहमीप्रमाणे स्कूल व्हॅनमधून शाळेत जायची आणि दुपारी घरी परतायची. मात्र, बुधवारी ती ठरलेल्या वेळेत ती घरी परतली नाही. यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाला फोन करून चौकशी केली. त्याने ती लवकरच घरी येईल, असे सांगितले. चिमुकली तब्बल दीड तास उशिरा घरी परतली, यावेळी ती भेदरलेल्या अवस्थेत होती. आईने चौकशी केल्यावर तिने गुप्तांगाला हात लावून, व्हॅन चालकाचे नाव घेतले. तसेच व्हॅन चालकाने आपल्याला मारहाण केल्याची माहितीही तिने दिली. पाहणी केल्यानंतर चिमुकलीचे पालक घाबरून गेले. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आरोपी चालकाला अटक : प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ संबंधित हालचाली करत व्हॅन चालकावर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले. तसेच पथक पाठवून त्या चालकाला अटक करण्यात आली.नंतर या चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 
व्हॅन फोडण्याचा प्रयत्न : व्हॅन चालकाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती काही वेळातच परिसरात पसरली. काही वेळातच जमाव जमा झाला. त्यांनी पोलीस ठाणे परिसरात येऊन तत्काळ गंभीर कारवाईची मागणी केली. 'राष्ट्रवादी'च्या संगीता चेंदवणकर याही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचल्या. याच काळात पोलिसांनी संबंधित स्कूल व्हॅन पोलीस ठाण्यात आणली होती. चेंदवणकर यांनी या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकारामुळे बदलापुरातील वातावरण तापले असून, पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software