जम्मू- काश्मिरात मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद; ११ गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

उधमपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला. हे वाहन दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १० जवान शहीद झाले. या अपघातात ११ जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना विमानाने उधमपूर लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. 

लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे कॅस्पर वाहन (ट्रक) दोडा येथील भादरवाह-चंबा रोडवरून प्रवास करत होते. या वाहनातून २१ जवान होते. आधीच खराब अवस्थेत असलेल्या या वाहनाच्या चालकाचे भादरवाह-चंबा आंतरराज्य रस्त्यावर खन्नी टॉपजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आतच हे वाहन तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळले. यात १० सैनिकांना जागीच वीरमरण आले.  जखमी सैनिकांपैकी एकाने मुख्यालयाशी संपर्क साधल्यावर घटनास्थळी तातडीने मदत पथकाला पाठवण्यात आले.

सैनिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य उशिरापर्यंत सुरू होते. बचाव पथकाने जखमींना अपघातस्थळावरून बाहेर काढून जवळच्या वैद्यकीय छावणीत नेले. जखमींपैकी तीन सैनिकांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी, ४ मे २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचे एक वाहन ६०० मीटर खोल दरीत कोसळून तीन सैनिकांचा मृत्यू झाला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software