एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले असता एकाकडे चक्क धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी तिघांनाही पकडून अटक केली. ही घटना रविवारी (१५ मार्च) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

पोलीस अंमलदार उत्तम जाधव यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी श्री. जाधव आणि पोलीस अंमलदार श्री. वाकळे हे डायल ११२ च्या ड्युटीवर होते. पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीत गस्त घालत असताना पहाटे अडीचच्या सुमारास त्यांना एमजीएम हॉस्पिटलच्या गेट नं. १ जवळ आडोशाला एक रिक्षा (MH20 DC1519) थांबलेला दिसला. रिक्षाच्या आडोशाला विनानंबरच्या मोटारसायकलीवर एक जण व रिक्षात दोघे बसलेले दिसले. पोलीस त्यांच्याकडे गेले असता ते पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले.

त्यांना सिडको पोलीस ठाण्यात आणले. शेख जुनेद शेख वाहेद (वय २१, रा. साजापूर, जामा मशिदीजवळ, ता. गंगापूर), शेख जावेद शेख करीम (वय २५,रा. एन ६, कब्रस्तानसमोर), नजीर खान रहीम खान (वय ३८, रा. इंदिरानगर बायजीपुरा) अशी त्यांची नावे समोर आली. त्यांची अंगझडती घेतली असता शेख जुनेदकडे कमरेला धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी चाकू, रिक्षा, विना नंबरची मोटारसायकल जप्त केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तिघे घरफोडी, चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उ‌द्देशाने अंधारात थांबले होते, असा संशय पोलिसांना आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार ज्ञानोबा जोमदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software