- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संत...
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
तुळजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलात आणि जाणार पण करताना दानपेटीत चुकून आपली काही वस्तू पडली तर ती दान म्हणून सोडून द्यावी लागणार आहे. कारण तुळजाभवानी मंदिर संस्थानने तसा फतवाच जारी केला आहे. संस्थानाने जुन्या ठरावाचा आधार घेत काढलेल्या या प्रमाणाचा एका भाविकाला फटका बसला असून, संस्थानच्या या निर्णयामुळे तुळजाभवानीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सुरज टिंगरे यांचा अर्ज वेटाळून लावताना तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 31 ऑगस्ट 2017 रोजी संमत केलेल्या ठरावाचा दाखला दिला आहे. देवीच्या दानपेटीत भक्तांनी नजर चुकीने टाकलेल्या किंवा त्यांच्याकडून पडलेल्या मौल्यवान वस्तू दान समजल्या जातील आणि त्या भक्तांना परत केल्या जाणार नाहीत, अशा स्वरूपाचा हा ठराव त्यावेळी पारित करण्यात आला होता. करतात दानपेटीत भाविकांचा मोबाईल पडल्यास मात्र संबंधित भाविकाच्या विनंतीनंतर ओळख पटवून तहसीलदार व प्रशासन व्यवस्थापक यांच्या परवानगीने तो त्याला परत केला जाईल, असेही या ठरावात म्हटलेले आहे. आता सुरज टिंगरे यांच्या अर्जाला उत्तर देताना मंदिर संस्थानने याच ठरावाचा दाखला दिला आहे. पण या निर्णयामुळे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा मंदिर संस्थान घेत असल्याचा आरोप होत असून पुजारी मंडळासह अनेक भक्तांनी हा ठराव मागे घेण्याची मागणी केली आहे. यावर मंदिर संस्थान कोणता निर्णय घेते याकडे तुळजाभवानीच्या राज्यभरातील भक्तांचे लक्ष लागले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 13:14:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई

