- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांचा दिल्लीत गौरव; सामाजिक कार्याची राष्ट्रीय
छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांचा दिल्लीत गौरव; सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल, कोण आहेत रमेश अण्णा मुळे जाणून घेऊ...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. दिल्लीत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकोत्तर जन्मजयंतीनिमित्त ३ जानेवारीला आयोजित विशेष कार्यक्रमात श्री. मुळे यांचा सन्मान करण्यात आला.
कोण आहेत रमेश अण्णा मुळे?
जेष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे हे मुळे अण्णा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष असून, २० वर्षांपासून अनेक उपक्रम राबवत आहेत. मराठवाडा व विदर्भामध्ये लाखो रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ देतात व गरीब कुटुंबांना अन्नधान्य ओषधोपचार व आर्थिक मदत वेळोवेळी करतात. कोरोनाच्या संकट काळात लोकांना जीवन जगण्यासाठी व कोरोनाग्रस्त रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे. अनेक मंदिर, शाळा, कौशलविकास केंद्रे, आश्रम, रुग्णालये यांच्या पायभरणीत व उभारणीत अण्णांचे योगदान आहे. महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय सेवक संघ, इतर समाजसेवी संस्थांसोबतही सेवाव्रत आहेत. गरजवंत गरिबांचे लग्नकार्ये, रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण सेवा, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, पोलीस मित्र सेवा त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून सेवेत निरंतर कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अनेक सेवाभावी उपक्रमात सहभागी होत असतात.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 13:53:24
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...

