- News
- वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आरटीईच्या नियमांना धाब्यावर बसवणे वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पालकांच्या तक्रारीनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी पत्र काढून शाळेला नियमबाह्य फी वसूल करू नका, अशी कडक शब्दांत समज दिली आहे.
गेल्या काही दिवसांत वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील इंग्रजी शाळा सर्रास विद्यार्थ्यांच्या पालकांची वेगवेगळी कारणे पुढे करून आर्थिक लूट करत आहेत. या शाळांवर शिक्षण विभागाची मेहरनजर असल्याचा आरोप होत आहे. आता पालकाने आरोप केलेला असूनही केवळ पत्र देऊन समज देण्यापलिकडे कोणतीही ठोस कारवाई करण्याची भूमिका घेतलेली नाही.
तक्रारदाराने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात शाळेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमधून काढले जाते. मागील सत्राची गुणपत्रिका दिली जात नाही. उशीराने फी भरणाऱ्यांकडून दंड वसूल करणे आदी प्रकार घडतात. फिस दिली नाही म्हणून एका दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीला अद्याप टीसी व मार्कमेमो न दिल्याने तिचे वर्ष वाया गेले आहे, ती विद्यार्थिनी न्यायालयात जाणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तिच्या पालकांनी सांगितले. ही विद्यार्थिनी तिसरीपासून दहावीपर्यंत याच शाळेत शिक्षण घेत होती. शाळेच्या सखोल चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती नियुक्त गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्त केली होती. त्या समितीच्या अहवालात काय म्हटले आहे, हे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र आता लेखी पत्र देऊन केवळ समज देण्यापलिकडे ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 20:27:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...

