टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या मारेकऱ्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हार्टॲटॅकने मृत्‍यू, हर्सूल कारागृहात भोगत होता जन्मठेप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या खंडणीच्या मागणीवरून अंडरवर्ल्डने घडवून आणली होती. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड, कुख्यात शूटर अब्दुल रऊफ उर्फ दाऊद मर्चंट (वय ६०) याचा गुरुवारी (८ जानेवारी) सकाळी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात हार्टॲटॅकने मृत्यू झाला. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. हर्सूल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

२००२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर २००३ मध्ये रऊफला येरवडा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलविण्यात आले होते. त्याला २००९ मध्ये पॅरोलवर (रजा) सोडण्यात आले होते. कुटुंबाला भेटण्यासाठी म्हणून हर्सूल जेलमधून बाहेर पडल्यानंतर तो फरारी झाला होता. तो बांगलादेशला पळून गेला होता. तिथे त्याला अवैध प्रवेशासाठी अटक झाली. नंतर दहशतवादी संबंधांच्या आरोपाखालीही त्याला अटक झाली. भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलणी करून २०१६ मध्ये त्याचे भारतात प्रत्यर्पण केले. त्यानंतर त्याला पुन्हा अटक होऊन तो हर्सूल कारागृहात होता. कारागृहात असताना ३० डिसेंबर २०२५ रोजी त्याला हार्टॲटॅक आला. घाटी रुग्णालयात उपचारांनंतर ४ जानेवारी रोजी त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र ८ जानेवारीला सकाळी त्याची तब्येत पुन्हा बिघडली आणि मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुलशन कुमार यांची अशी केली होती हत्या...
अंधेरीतील शिवमंदिरातून बाहेर पडत असताना गुलशन कुमार यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक असलेल्या अब्दुल रऊफ मर्चंटने गुलशन कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडल्या होत्या. या खळबळजनक हत्येने संपूर्ण देश हादरला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!

Latest News

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या! वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लॉजवर गेल्यानंतर तिने ब्लॅकमेल सुरू केल्याने ५१ वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीतच...
कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्‍त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्या हत्‍येचे गूढ उकलले!!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार!, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजकांची नोंदणी सुरू...
बिडकीनजवळील जुगार अड्ड्यावर छापा, ‘या’ ७ जणांना पकडले!‌
१६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले, छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software