चोर तो चोर अन्‌‍ वर शिरजोर... मानहानी केल्याचा पोलिसांवर ठोकला दावा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

बर्लिन (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चोर तो चोर अन्‌‍ वर शिरजोर अशी एक म्हण आहे. ही म्हण जर्मनीच्या एका चोराच्या बाबतीत खरी ठरली असून, आचेन शहरातील एका प्रसिद्ध बँकेत चोरी करणाऱ्या चोराने पोलिसांवर अटकेनंतर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. न्यायालयात त्याने मानहानीचा दावा दाखल केला असून, नुकसानभरपाई मागितली आहे. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत.

आचेन शहरातील नोरिस बँकेत ही चोरी झाली. चोराने बंदुकीचा धाक दाखवून कॅशियरला दोन लाख पाऊंड (सुमारे १४ लाख रुपये) मागितले. कॅशियर हुशार होता, त्याने गुपचूप जवळील सुरक्षा अलार्मचे बटन दाबले. अलार्मचा आवाज बँकेजवळून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाने ऐकला.  त्यामुळे पोलीस तातडीने बँकेकडे आले. त्यांनी अतिरिक्त पोलीस कुमकही मागवून घेतली. काहीच वेळात पोलिसांनी बँकेला घेरले. सुमारे एक तास पोलीस आणि चोरांमध्ये चकमक सुरू होती. पोलिसांनी त्याला वारंवार शरण येण्याचे आवाहन केले. पण पोलीस आपल्याला मारहाण करतील, क्रूर वागणूक देतील, असे चोर पोलिसांना सांगत होता.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला वचन दिले की, शरण आल्यास पोलीस क्रूर वागणूक देणार नाहीत. पोलिसांच्या या वचनावर त्यानेही विश्वास ठेवला आणि बंदूक टाकून पोलिसांना शरण गेला. पण पोलिसांनी आपले खरे रूप दाखवून देत त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याचे कपडे उतरवून फटके देत नग्न धिंड काढली. पोलिसांनी आपले वचन पाळले नसल्याचा आरोप करत चोराने आपल्या झालेल्या अपमानाचा बदला म्हणून पोलिसांवरच खटला दाखल केला. नग्न धिंड काढल्यामुळे आपल्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याचे त्याने दाव्यात म्हटले आहे. या अनोख्या दाव्यामुळे पोलीस तर हादरून गेलेच आहे, पण न्यायालयही मोठ्या विवंचनेत सापडले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software