उनके बिना हमे जीने का अधिकार भी नही है… पतीच्या खुनानंतर २३ वर्षीय विवाहितेनेही गळफास घेत संपवली जीवनयात्रा !

On

अमरावती (सीएससीएन न्यूजडेस्क) : हम उन्हे भुला नही सकते!, उनके बिना जिंदा भी नहीं रह सकते, उनके बिना हमे जीने का अधिकार भी नही है, उनके बिना ये जिंदगी अधुरी है… अशा ओळी लिहून ठेवत एका २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. अमरावतीतील मसानगंज येथील रमेश ऑइल मिल गल्लीत २५ जून रोजी रात्री ९ […]

अमरावती (सीएससीएन न्यूजडेस्क) : हम उन्हे भुला नही सकते!, उनके बिना जिंदा भी नहीं रह सकते, उनके बिना हमे जीने का अधिकार भी नही है, उनके बिना ये जिंदगी अधुरी है… अशा ओळी लिहून ठेवत एका २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. अमरावतीतील मसानगंज येथील रमेश ऑइल मिल गल्लीत २५ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. शहरातीलच कडबी बाजार परिसरात २ मार्च रोजी सायंकाळी तिचा पती आदर्श राजेश गुप्ता (२६, रा. मसानगंज) याची चाकूने भोसकून हत्या झाली होती.

ज्युली ऊर्फ इशिका आदर्श गुप्ता (२३) असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आदर्शपाठोपाठ ज्युलीच्या मृत्‍यूमुळे त्यांची आदर्शिका ही अवघ्या सहा महिने वयाची मुलगी पोरकी झाली आहे. पतीच्या हत्‍येपासून ज्युली ऊर्फ इशिका या विमनस्क राहत होत्या. पतीवर प्रचंड प्रेम असल्याने त्या सतत विचामग्न राहायच्या. पतीशिवाय मी अस्तित्वहीन झाले. आता कुणासाठीजगायचे, हा एकच प्रश्न त्या विचारायच्या. पतीविरहात अबोल झालेल्या ज्युली यांनी अखेर २५ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. मसानगंज येथील राहत्या घराच्या तिसऱ्या माळ्यावरील खोलीत त्यांनी फॅनला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

बऱ्याच वेळची का खाली आली नाही, असा विचार करून तिसऱ्या माळ्यावर पोहोचलेल्या सासूला सुनेचा मृतदेहच गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. ज्युली ऊर्फ इशिका या पतीच्या मृत्यूनंतर सासू सासऱ्यांसमवेत मसानगंज येथेच राहत होत्या. घटनेची माहिती तातडीने नागपुरी गेट पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तेथे सुसाईड नोटदेखील मिळून आली. पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला जीवन जगण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे लिहित मुलगी आदर्शिका हिला इंग्रजी माध्यमातून उच्चशिक्षण द्यावे, तिचे पालनपोषण करावे, अशी विनंती सासू-सासऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांनी दिली. दरम्यान, शवविच्छेदनानंतर गुरुवारी दुपारी ज्युली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software