- Marathi News
- फिचर्स
- नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
On

तुम्ही कधी आणि कोणाला कॉल केला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कॉल हिस्ट्री पाहू शकता. लोकांना अनेक वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या कारणांसाठी त्यांच्या कॉल हिस्ट्रीची आवश्यकता असते. यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या संपर्कांबद्दल माहितीदेखील मिळते. नवीन फोन घेतल्यानंतर कॉल हिस्ट्री डिलीट होते. मात्र आता तुम्ही कॉल हिस्ट्री नवीन मोबाइलमध्येदेखील पाहू शकता. जर तुम्ही जिओ वापरकर्ता असाल आणि कॉल हिस्ट्री पाहू इच्छित असाल तर ते खूप सोपे आहे. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची आवश्यकता नाही. तुमच्या जिओ नंबरची अनेक महिन्यांची कॉल हिस्ट्री तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाइट, ॲप आणि अगदी व्हॉट्स ॲपवरूनही मिळू शकतो. ते कसे ते जाणून घेऊया...
स्टेप १ : जर तुम्हाला तुमची कॉल हिस्ट्री पहायची असेल, तर तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये मायजिओ ॲप उघडावे लागेल.
स्टेप २ : प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
स्टेप ३ : तुम्हाला माझा वापर विभागात जावे लागेल. येथे कॉल विभागात जा.
स्टेप ४ : आता तुम्हाला बरेच कॉल दिसतील.
स्टेप ४ : यानंतर तुम्हाला खाली येऊन Do You Want to view detailed usage Statement या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप ६ : येथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार सात दिवस, १५ दिवस, ३० दिवस आणि कस्टम तारखेमधून कोणताही पर्याय निवडू शकता.
स्टेप ७ : नंतर जर तुम्हाला ई-मेलद्वारे तपशील हवे असतील तर हा पर्याय निवडा आणि खाली दिलेल्या निळ्या बटणावर क्लिक करा.
स्टेप ८ : याद्वारे तुम्ही कोणत्या नंबरवर किती वेळ आणि कोणत्या वेळी कॉल केला हे पाहू शकाल.
स्टेप १ : ब्राउझरवर जिओ लॉगिन पेज उघडा. नंतर तुमच्या नंबरने लॉगिन करा. यासाठी, नंबर एंटर केल्यानंतर, त्यावर एक ओटीपी येईल, जो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एंटर करावा लागेल.
स्टेप २- आता स्टेटमेंट सेक्शनमध्ये जा. नंतर वेळ निवडा. आता व्ह्यू स्टेटमेंटवर क्लिक करा.
स्टेप ३- नंतर युसेज चार्जेसमध्ये जा आणि व्हॉइस निवडा.
स्टेप ४- यानंतर, हिस्ट्री पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा.
My Account Statement लिहा आणि ते व्हॉट्स ॲप नंबर ९१ ७०००७७०००७ वर पाठवा. यानंतर तुम्हाला एक लिंक मिळेल. लिंकवर क्लिक करताच तुम्ही Jio ॲपवर पोहोचाल आणि तुमची कॉल हिस्ट्री उघडेल.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
By City News Desk
Latest News
29 Aug 2025 20:31:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या...