प्रेम, पळून जाऊन लग्न, हॉटेलवर शारीरिक संबंध, तरुणीचा यू टर्न, प्रियकर लैंगिक अत्‍याचाराच्या गुन्ह्यात, ‘सैराट’चे २ ‘साइड हिरो’ही कायद्याच्या कचाट्यात!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बी. टेक.च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या १८ वर्षीय तरुणीला प्रेमप्रकरणातून पळवून नेत २३ वर्षीय तरुणाने लग्‍न केले. नंतर हॉटेलवर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिच्या घरच्यांनी दोघांना पकडून आणल्यानंतर तरुणीने आता तरुणाविरुद्ध  लैंगिक अत्‍याचार केल्याची तक्रार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी तिच्या प्रियकरासह मदत करणाऱ्या त्‍याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऋतिक सांडू सलामपुरे (वय २३, रा. वाळूज एमआयडीसी परिसर) असे संशयिताचे नाव असून, तक्रारदार तरुणी बजाजनगरात राहते. काही दिवसांपासून त्‍यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांनी एकत्र फोटोही काढले होते. २० ऑगस्टला पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवत २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर साडेबाराला ते कारने पुण्यातील आळंदीला गेले. त्‍यांच्यासोबत ऋतिकचे मित्र नितीन गावंडे व आणखी एक जण होता. आळंदीत आर्य समाज पद्धतीने ऋतिक आणि तरुणीने लग्न केले. त्यानंतर पुण्यातील नाना पेठ येथील हॉटेलवर थांबले. तिथे दोघांत वारंवार शारीरिक संबंधही झाले. तरुणी घरातून गायब झाल्याने तिच्या घरच्यांनी शोध सुरू केला होता.

दोघांचा तपास करत ते पुण्यात येऊन धडकले. तरुणी आणि ऋतिकला ताब्‍यात घेऊन त्‍यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तरुणीने यू टर्न घेत ऋतिकविरुद्ध लैंगिक अत्‍याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्‍याच्या दोन मित्रांनाही तक्रारीत घेतले आहे. तिच्या आरोपानुसार, ऋतिक काही महिन्यांपासून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तिने नकार दिल्यावरही तिच्या भावाला जीवे मारण्याची व  तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव आणला. पळून जाऊन लग्नास नकार दिल्यावर त्याने पुन्हा धमक्या दिल्या. त्याने कारमधून आळंदीला नेले आणि जबरदस्तीने लग्न केले. नंतर हॉटेलवर थांबवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्‍याचार केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software