वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय मुन्नूबाई अजय बेसरा हिचे दोन्ही हात मशीनमध्ये अडकून गंभीर दुखापत झाली असून, तिचे दोन्ही हात मनगटापासून कापावे लागले आहेत.

१६ ऑगस्टलाच मुन्नूबाई कामाला लागली होती अन्‌ २४ ऑगस्टला सकाळी १० वाजता मशीनवर कामाला तिला बसविण्यात आले, ज्यामुळे अपघात झाला. तिला तात्काळ बजाजनगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवस उलटूनही पोलिसांना या घटनेची माहिती नसल्याचे समोर आले आहे. कारखानदार व रुग्णालय अपघाताची नोंद पोलिसांना वेळेत देत नसल्याने कारवाईला उशीर होतो, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सीएससीएनला सांगितले.

रुग्णालये माहिती लपवतात?
दुर्घटनेनंतर कंपनीचालक कामगारांवर दबाव आणतात. कोणाला सांगितले तर उपचार करणार नाही, अशा धमक्या देतात. त्यामुळे कामगार उघडपणे बोलत नाहीत. पोलिसांत तक्रारही करत नाही. परंतु रुग्णालयाची जबाबदारी असतानाही काही खासगी रुग्णालये पोलिसांना माहिती न देता परस्पर प्रकरणे सेटलमेंट करून देत असल्याचे धक्कादायक प्रकार सर्रास घडत असतात. त्‍यामुळे रुग्णालयांना दोषी ठरवून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, असे मत काँग्रेसचे गंगापूर - खुलताबाद विधानसभा अध्यक्ष अलीम सय्यद यांनी व्यक्‍त केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

Latest News

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...
खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software