वैजापूरमध्ये मनोरुग्ण महिलेची उघड्यावर प्रसुती; सातफेरे सोबत घेणाऱ्याची ‘माणुसकी’ हरवली; पण ना रक्ताचे, ना नात्याचे लोक ‘माणुसकी’ने धावून आले...

On

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर उघड्यावरच ३२ वर्षीय मनोरुग्ण महिलेची प्रसुती झाली. ही घटना बुधवारी (२८ ऑगस्ट) पहाटे ३ च्या सुमारास घडली.

ही महिला तालुक्यातील एका गावची रहिवासी असून, तिच्या दारूड्या नवऱ्याने तिला मंगळवारी रात्री गर्भवती अवस्थेत पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर एकटे सोडून दिले होते. काही तासांतच बुधवारी पहाटे तीनला तिने बाळाला जन्म दिला. तिला मुलगा झाला आहे. ही माहिती मिळताच आसरा फाउंडेशनचे वाहेद अहमद पठाण घटनास्थळी धाव घेतली. बाळ आणि बाळंतिणीला वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर मुंढे आणि त्‍यांच्या सहकाऱ्यांनी महिला व तिच्या बाळावर आवश्यक उपचार केले. उपचारानंतर तिला वाहेद पठाण, प्रकाश पवार, अभिषेक देशमुख, इरफान पठाण, मंगेश खाडे, अमृत वळवी यांनी सुरक्षितपणे घरी पोहोचवले. महिलेच्या नातेवाइकांचेही समुपदेशन करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software