- Marathi News
- पॉलिटिक्स
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना कारावासाची शिक्षा, पोलीस निरीक्षकाच्या गालात मारल्याचे प्रकरण
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना कारावासाची शिक्षा, पोलीस निरीक्षकाच्या गालात मारल्याचे प्रकरण
On
.jpg)
नागपूर/छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव यांना बुधवारी (६ ऑगस्ट) नागपूर सत्र न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. एकूण २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायाधीश आर. जे. राय यांनी हा निकाल दिला. जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यामधील पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे त्यांच्यावर हा खटला चालला.
१७ डिसेंबर २०१४ ला हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हॉटेल प्राइडमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरू होती. तिथे कुणालाही येऊ न देण्याचे आदेश होते. हर्षवर्धन जाधव तिथे आले. त्यांना आतमध्ये जाण्यास सुरक्षेसाठी तैनात विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी मनाई केली. बैठकीत जाण्यासाठी दिवाकर रावते व एकनाथ शिंदे आले. त्यांना नेण्यासाठी बैठकीतून रामदास कदम आले. त्यांनी दोघांनाही बैठकीला नेले. मात्र हर्षवर्धन जाधव यांना नेले नाही. हर्षवर्धन जाधव यांना मनाई करण्यात आल्याने त्यांनी आरडा-ओरड करीत आत जाण्याचा प्रयत्न केला. तरीही पराग जाधव यांनी आत सोडले नाही. याचवेळी आरडाओरड करून हर्षवर्धन जाधव यांनी पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ते तेथून बेपत्ता झाले होते. पराग जाधव यांनी सोनेगाव पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
By City News Desk
बैलगाडी उलटून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
07 Aug 2025 13:25:22
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील पार्किंगची समस्या आता सुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट...