- Marathi News
- सिटी क्राईम
- आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्तांची भूमिका!!; म्हणाले...
आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिक्रमण हटाव मोहिमेत महापालिकेच्या आततायी भूमिकेमुळे पोलिसांची गोची होताना दिसत आहे. अनेकदा मार्किंग नसते, न्यायालयात वाद चालू असतो, तरी लगेच बुलडोझर पुढे केला जातो. त्यामुळे कडाडून विरोध सुरू होतो. अशावेळी महापालिका पोलिसांना पुढे करते. या विरोधाला पोलिसांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सावध भूमिका घेतली असून, यापुढे थेट पाडापाडी करू नका. रीतसर नोटीस, मालमत्तांवर मार्किंग करावी. आक्षेप असल्यास शंकांचे निरसन करा. त्यानंतरच पाडापाडी सुरू करा, अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतली आहे.
नारेगावच्या नागरिकांनी २४ तासांचा वेळ मागूनही केवळ २ तास दिले असले तरी, हर्सूलमध्ये मात्र पाडापाडी करण्याआधी ७ दिवसांची नोटीस देण्यात येणार आहे. हर्सूलमधील नागरिकांनी आधी मोबदल्याची मागणी केली असून, त्याशिवाय पाडापाडीला कडाडून विरोध केला आहे. हर्सूलमधील ३०० मालमत्ता रस्ता रूंदीकरणात येत आहेत. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले असून, २७ मालमत्ताधारकांना आता नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ७ दिवसांची नोटीस देण्याबद्दल मनपाचे अतिक्रमण हटाव विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले, की हर्सूल रस्त्यावरील काही मालमत्ताधारक न्यायालयात गेले होते. बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण केल्याचे तेथे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे त्यांना ७ दिवसांची नोटीस बजावण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
पाडापाडीमुळे बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडे येणाऱ्या अर्जांचा ओघ वाढला आहे. याचा गैरफायदा वास्तुविशारद घेत असून, ते मालमत्ताधारकांची लूट करताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेने दर निश्चित करून देण्याची मागणी केली जात आहे. कुणी १५ हजार, तर कुणी २५ हजार रुपये शुल्क घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, की गुंठेवारी शुल्कावर टक्केवारी ठरवून वास्तुविशारदांना पैसे दिले जाणार आहेत. लवकरच हे दर जाहीर केले जातील.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
By City News Desk
बैलगाडी उलटून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
07 Aug 2025 13:25:22
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील पार्किंगची समस्या आता सुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट...