महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय... 

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील पार्किंगची समस्या आता सुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वावर ठिकठिकाणी पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पार्किंगचे तासानुसार स्लॉट असतील. वाहनधारकांना स्लॉट ऑनलाईन पद्धतीने बुक करता येतील. जड वाहनांसाठी वेगळी सुविधा असेल. व्यापाऱ्यांनाही ग्राहकांसाठी स्लॉट बुक करता येतील.

या उपक्रमातून ७५ टक्के महिला, २५ टक्के पुरुषांना रोजगार मिळणार असल्याची माहिती बुधवारी (६ जुलै) पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांना दिली. सध्या बाजारपेठेत पार्किंगची अधिकृत व्यवस्थाच नाही. वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. महापालिका आणि वाहतूक पोलीस वाहने उचलून नेतात. भलामोठा दंडही आकारतात. याला नागरिकही वैतागले आहेत. त्‍यामुळे या उपक्रमाचे नागरिकांतून स्वागत होईल, अशी अपेक्षा महापालिका आणि पोलीस प्रशासनाला आहे. पार्किंग धोरण राबविण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. यात रस्त्यावर आवश्यक पथदिवे, सीसीटीव्हीची व्यवस्था महापालिका करणार आहे हे विशेष. सण, उत्सवाच्या काळात पार्किंगचे स्लॉट बंद असतील. ते ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जातील.

असा प्रकल्प अहमदाबादमध्ये
अशा पद्धतीचा प्रकल्प अहमदाबादमध्ये राबवला जातो. या उपक्रमात छत्रपती संभाजीनगरातील तृतीयपंथीयांनाही काम देण्याचा विचार केला जात आहे. बैठकीला स्मार्ट सिटीचे प्रकल्प अधिकारी फैज अली, अतिक्रमण हटावचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील, सुभाष भुजंग, मनीष कल्याणकर, मनोज पगारे यांच्यासह वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, खाजगी एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते. उभ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी त्याच रकमेत विमा पद्धतीचा अवलंब करता येईल का, याचीही चाचपणी केली जात आहे. हा प्रकल्प राबविण्याआधी मात्र शहरात नो पार्किंग झोन घोषित करावे लागणार आहेत. हॉकर्स झोनबद्दलही निर्णय घ्यावा लागणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तूर पिकात गवतात लपला होता साप, गवत उचलताच शेतकऱ्यांना दंश, छ. संभाजीनगरला आणत असतानाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

Latest News

तूर पिकात गवतात लपला होता साप, गवत उचलताच शेतकऱ्यांना दंश, छ. संभाजीनगरला आणत असतानाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना तूर पिकात गवतात लपला होता साप, गवत उचलताच शेतकऱ्यांना दंश, छ. संभाजीनगरला आणत असतानाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : नावडी (ता. कन्‍नड) येथील रामेश्वर काशिनाथ जाधव (वय ५२) या शेतकऱ्याचा शेतात काम करताना साप चावल्याने...
नदीत आंघोळीला उतरलेला १८ वर्षीय तरुण बुडाला!; कन्‍नड तालुक्‍यातील घटना
छ. संभाजीनगरात ३ भीषण अपघात : कंटेनर-एसटी बस अपघातात वाळूजजवळ ८ प्रवासी जखमी, पैठणमध्ये पिकअप झाडाला धडकून २५ जखमी, वैजापूरमध्ये कारने दुचाकीस्वाराचा घेतला बळी!
महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय... 
ठाकरे गटाच्या महिला सरपंच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव?, मावसाळाच्या राजेश्री देवगिरीकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software