कर्मचारी महिलांना घरी बोलावून मालिश करून घेतली; ‘सामाजिक कल्याण’च्या  तत्‍कालिन उपायुक्‍तांविरुद्ध गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सामाजिक कल्याण विभागाच्या तत्कालीन उपायुक्त तथा विभागीय जात पडताळणी समिती सदस्य जयश्री सोनकवडे व वॉर्डन वैशाली कळासरे यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात बुधवारी (६ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यांच्याविरुद्ध सामाजिक कल्याण वसतिगृहात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना महिलांना घरी बोलावून मालिश करून घेण्यासह वैयक्तिक कामे करायला लावल्याचा आरोप आहे.

एका महिलेने या प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, २०२३ मध्ये त्या समाजकल्याण विभागात कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून  रूजू झाल्या होत्या. एप्रिलमध्ये वॉर्डन वैशाली कळासरे यांनी त्यांच्यासह अन्य महिला कर्मचाऱ्यांना जयश्री सोनकवडे यांच्या पडेगावच्या घरी काम करायला सांगितले. अन्यथा कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्‍यामुळे इच्छा नसतानाही तक्रारदार महिलेसह अन्य महिला त्‍यांच्याकडे काम करायला गेल्या.

त्‍यावेळी सोनकवडे यांनी त्यांच्याकडून मालिश करवून घेण्यासह सर्व प्रकारची घरगुती काम करवून घेतली. त्‍यात चूक झाल्यास त्‍या अश्लील शिवीगाळ करीत होत्या, असे तक्रारीत म्‍हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांच्या आदेशावरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास केला जात आहे. विशेष म्‍हणजे सोनकवडे या महिला कर्मचाऱ्यांकडून मालिश करून घेत असल्याचा व्हिडीओसुद्धा यापूर्वी व्हायरल झाला होता. त्‍यावरून सोनकवडे यांनी व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करणाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही केली होती. त्‍यानंतर आता सोनकवडे आणि वॉर्डन कळासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तूर पिकात गवतात लपला होता साप, गवत उचलताच शेतकऱ्यांना दंश, छ. संभाजीनगरला आणत असतानाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

Latest News

तूर पिकात गवतात लपला होता साप, गवत उचलताच शेतकऱ्यांना दंश, छ. संभाजीनगरला आणत असतानाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना तूर पिकात गवतात लपला होता साप, गवत उचलताच शेतकऱ्यांना दंश, छ. संभाजीनगरला आणत असतानाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : नावडी (ता. कन्‍नड) येथील रामेश्वर काशिनाथ जाधव (वय ५२) या शेतकऱ्याचा शेतात काम करताना साप चावल्याने...
नदीत आंघोळीला उतरलेला १८ वर्षीय तरुण बुडाला!; कन्‍नड तालुक्‍यातील घटना
छ. संभाजीनगरात ३ भीषण अपघात : कंटेनर-एसटी बस अपघातात वाळूजजवळ ८ प्रवासी जखमी, पैठणमध्ये पिकअप झाडाला धडकून २५ जखमी, वैजापूरमध्ये कारने दुचाकीस्वाराचा घेतला बळी!
महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय... 
ठाकरे गटाच्या महिला सरपंच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव?, मावसाळाच्या राजेश्री देवगिरीकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software