- Marathi News
- जिल्हा न्यूज
- ‘देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा संत शक्ती मैदानात उतरते’; मुख्यमंत्री
‘देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा संत शक्ती मैदानात उतरते’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत २ मोठ्या घोषणा!
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा हे सांस्कृतिक आक्रमण थोपविण्यासाठी संत शक्ती मैदानात उतरते. संतांच्या विचारांचे महत्त्व त्याचमुळे अबाधित आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, ६ ऑगस्ट रोजी देवगाव शनि (ता. वैजापूर) येथे दिले.
.jpg)
.jpg)
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की वारकरी संप्रदायाने जगाला विशाल दृष्टीकोन दिला. हीच आपली खरी संस्कृती आहे. संत गंगागिरी महाराजांच्या या पवित्र स्थानावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी १ एकर जागेवर मोठे सभागृह बांधण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील म्हणाले, की या भागातील उच्च पातळी बंधारा बांधकामाच्या मागणीला मी दुजोरा देतो. या भागातील या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या भागातील अध्यात्मिक चळवळ ही आम्हा सगळ्यांना मार्गदर्शक आहे. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे सप्ताह समितीतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री महोदय व मान्यवरांनी फुगडी खेळून सांगता सोहळ्याचा आनंद लुटला.